प्रातिनिधिक छायाचित्र 
महाराष्ट्र

रत्नागिरी पॅसेंजर तीन वर्षांनंतरही दिव्यापर्यंतच; कोकणातील प्रवाशांचे हाल कायम

कोकणवासियांचा मुंबई ते रत्नागिरीचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी दादर ते रत्नागिरी पॅसेंजर सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, करोना काळात ही सेवा बंद करून सप्टेंबर २०२१ पासून दादरऐवजी दिव्यावरून रत्नागिरीपर्यंत पॅसेंजर सेवा चालवण्यात येत आहे.

Swapnil S

मुंबई : कोकणवासियांचा मुंबई ते रत्नागिरीचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी दादर ते रत्नागिरी पॅसेंजर सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र, करोना काळात ही सेवा बंद करून सप्टेंबर २०२१ पासून दादरऐवजी दिव्यावरून रत्नागिरीपर्यंत पॅसेंजर सेवा चालवण्यात येत आहे. गेल्या तीन वर्षांपासून दादरहून थेट रत्नागिरी जाणारी पॅसेंजर सेवा बंद असल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.

कोकणवासियांसाठी १९९६ - ९७ पासून लोकमान्य टिळक टर्मिनसवरून रत्नागिरी पॅसेंजर गाडी सुरू करण्यात आली. ही गाडी दादरहून सोडण्याची मागणी झाल्यानंतर ही पॅसेंजर दादर ते रत्नागिरी मार्गावर धावू लागली. कोकणातील लहानमोठ्या गावांतून सकाळी निघून मुंबई शहरात पोहोचून दुपारपर्यंत कामे आवरून त्याच दिवशी गावी परत जाण्यासाठी सर्वांनाच या गाडीचा मोठा आधार होता. परंतु, २०२० च्या शून्य आधारित वेळापत्रकात वक्तशीरपणा सुधारण्यासाठी मध्य रेल्वेने ही गाडी दिव्यापर्यंतच चालवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सप्टेंबर २०२१ पासून रत्नागिरी दादर- रत्नागिरी पॅसेंजर ही रत्नागिरी - दिवा - रत्नागिरी पॅसेंजरमध्ये रूपांतरित करण्यात आली. परंतु, आता ही गाडी दिवा स्थानकातून सुटत असल्याने दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, पश्चिम उपनगरे, वसई, विरार, नालासोपारा, गुजरात येथे स्थायिक असणाऱ्या कोकणवासीयांना दिवा येथे जाणे-येणे त्रासदायक झाले आहे.

वारंवार लोकप्रतिनिधी व प्रवाशांनी ही गाडी दादरपर्यंत चालविण्याची मागणी होत असतानाही मार्गाची क्षमता नसल्याचे कारण देणारे रेल्वे प्रशासन त्याच वेळेत त्याच दादर स्थानकातून गोरखपूर व बलियासाठी विशेष रेल्वे चालवत आहे, असे कोकण विकास समितीकडून सांगण्यात आले. दिवा-रत्नागिरी, दिवा-सावंतवाडी या दोन्ही रेल्वेगाड्या दादर किंवा सीएसएमटीपर्यंत चालवण्यात याव्यात, असे कोकण विकास समितीचे सदस्य अक्षय महापदी यांनी सांगितले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी