महाराष्ट्र

रावेर लोकसभेत सून विरुद्ध सासरा सामना रंगणार? एकनाथ खडसे म्हणाले....

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकनाथ खडसे यांना रावेर मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्याता असल्याच्या सध्या चर्चा सुरु आहेत. राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याबाबत सुचवलं आहे. जळगाव दौऱ्यावर असताना एका सभेत बोलताना पाटील म्हणाले की, रावेर मतदारसंघाचा बाण तुम्ही उचलावा. दरम्यान, एकनाथ खडसे यांनी देखील याबाबत अनुकल असल्याचं सांगितलं आहे. लोकसभा लढवण्यास मी फार उत्सूक नाही. परंतु, पक्षाने जबाबदारी सोपवल्यास ती जबाबदारी मी निभावेन, असं खडसे म्हणाले आहेत.

याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जळगावात केलेल्या एका भाषणात मी रावेर लोकसभा क्षेत्राचा धनुष्यबाण तु्म्ही उचलावा अशी आमची इच्छा असल्याचा म्हणाले. खरतर रावेर लोकसभा मतदारसंघ हा आजवर काँग्रेस कडे होता. १९८९ साली हा लोकसभा मतदार संघ तयार झाला. तेव्हापासून आतापर्यंत पोटनिवडणुकांसह या मतदार संघात आतापर्यंत १० निवडणुका झाल्या. यापैकी ९ निवडणुकांमध्ये काँग्रेसचा पराभव झाला आहे. केवळ एक निवडणूक जिंकत काँग्रेसने १३ महिन्यांसाठी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला होता.

एकानाथ खडसे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना रावेरमध्ये काँग्रेसचा ९ वेळा पराभ झाला असल्याने याठिकाणी बदल करावा आणि आम्हाला ही जागा द्यावी अशी सुचना राष्ट्रवादीने केली. इंडिया आघाडीच्या बैठकीत अजून याबाबत निर्णय व्हायचा आहे. निर्णय झाला तर तो काँग्रेसचा असले किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा. जागा राष्ट्रवादीला मिळाली आणि पक्षाने मला आदेश दिला तर मी पक्षाच्या सुचनेचा नक्की विचार करेन.

सध्या या मतदारसंघात एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे या भाजपकडून खासदार आहेत. जर पक्षाने पुन्हा रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आणि राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना मैदानात उतरवलं, तर सासरा विरुद्ध सून असा सामना रावेर मतदार संघात बघायला मिळेल.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल