आम्ही आरोप केले तर अडचण होईल; रवींद्र चव्हाण यांचा अजित पवार यांना इशारा 
महाराष्ट्र

आम्ही आरोप केले तर अडचण होईल; रवींद्र चव्हाण यांचा अजित पवार यांना इशारा

'केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे पारदर्शक नेतृत्व असणाऱ्या भाजपवर आरोप करण्यापूर्वी अजित पवार यांनी विचार करावा, अन्यथा आम्ही आरोप करायला गेलो तर त्यांना मोठ्या अडचणी निर्माण होतील', असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला.

Swapnil S

पुणे : 'केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असे पारदर्शक नेतृत्व असणाऱ्या भाजपवर आरोप करण्यापूर्वी अजित पवार यांनी विचार करावा, अन्यथा आम्ही आरोप करायला गेलो तर त्यांना मोठ्या अडचणी निर्माण होतील', असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला. 'अजित पवार, आप खुद के गिरेबान में झाक कर देखिए', असा टोलाही त्यांनी लगावला.

क्रांतिज्योती यांच्या सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना आणि इच्छुक उमेदवारांना पुढील पाच वर्षांच्या कामाची शपथ दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांचा पाढा वाचला. पुणे शहराचा कायापालट करून त्याला जागतिक दर्जाचे शहर बनवण्याचे व्हिजन केवळ भारतीय जनता पार्टीकडेच आहे असे ते म्हणाले.

अजित पवार यांची भाजपवर टीका

दरम्यान, आशिया खंडातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका अशी ओळख असलेल्या पिंपरी-चिंचवड शहराच्या जडणघडणीत आपण कधीही सत्तेचा गैरवापर होऊ दिला नाही, मात्र आता केवळ भ्रष्टाचार करून पैसे कमवण्याचा एककलमी कार्यक्रम सुरू असल्याची टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी भाजपवर पिंपरी-चिंचवड येथील पत्रकार परिषदेत केली होती, त्याला चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली