महाराष्ट्र

Vasant More : एखाद्या पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन बैठक घेऊ, शहर कार्यालय सोडून कुठेही बैठकीला येण्यास तयार - वसंत मोरे

प्रतिनिधी

पुण्यातील मनसेच्या महत्वाच्या चेहऱ्यांपैकी एक समजले जाणारे वसंत मोरे (Vasant More) हे गेल्या काही महिन्यांपासून मनसेमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सातत्याने येत आहेत. कट्टर राज ठाकरे समर्थक समजले जाणारे वसंत मोरे वेळोवेळी आपली भूमिका ठामपणे मांडताना दिसतात. मात्र अमित ठाकरे आणि त्यांची आयोजित केलेल्या बैठकीसाठी ते मनसेच्या पुणे शहर कार्यालयात जाण्यास तयार नसल्याचे समजते आहे.

काय कारण सांगितले वसंत मोरेंनी ?

इतर कार्यकर्त्यांना आणि मला बैठकीसाठी वेगवेगळे बोलवण्यात आले. माझ्या मते जिथे मी मनपा ताब्यात घेतल्यानंतर गुलाल उडवण्याची स्वप्न जिथे पाहिली तिथे वसंत मोरेच पद गेल्यानंतर गुलाल उडविण्यात आला. ज्याठिकाणी मी फुले वेचली तिथे काटे वेचायला मी जाणार नाही.

वसंत मोरे यांनी सांगितले की, अमित ठाकरेंसोबत माझी ही पहिलीच भेट आहे. शहर कोअर कमिटीच्या बैठका बाहेरच होत असत. आता नगर कार्यालयात बैठक घ्यावी, असा अट्टाहास का, असा सवाल वसंत मोरे यांनी केला. शहरातील कोणत्याही शाखा अध्यक्षाच्या घरी चला, मी यायला तयार आहे. एखाद्या पदाधिकाऱ्याच्या घरी जाऊन बैठक घेऊ. वसंत मोरे यांनीही शहर कार्यालय सोडून कुठेही बैठकीला येण्यास तयार असल्याचे सांगितले.

मुंबईत २७ ते २९ एप्रिलदरम्यान उष्णतेची लाट, हवामान खात्याचा इशारा; 'असा' बचाव करा

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात ६१ टक्के मतदान; उत्तर प्रदेशात सर्वात कमी प्रतिसाद, तर 'या' राज्यात सर्वाधिक टक्केवारी

जरांगे-पाटील उतरणार विधानसभेच्या मैदानात, राज्यात २८८ जागांवर उमेदवार देणार; प्रस्थापितांना धक्के बसणार?

आता शेतकऱ्यांना मिळणार केवळ ५ मिनिटांत कर्ज; नाबार्ड-आरबीआय इनोव्हेशन हब यांच्यात करार

दुसऱ्या टप्प्यातही यादीत घोळ; अनेकजण मतदानाविना परतले, प्रशासनाची अनास्था कायम