संग्रहित छायाचित्र  
महाराष्ट्र

भाजपकडून २७ जणांची हकालपट्टी; जळगाव महापालिका निवडणुकीत उमेदवारी मागे न घेता केली होती बंडखोरी

या गंभीर प्रकाराची दखल घेत भाजप नेतृत्वाने पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या तब्बल २७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्याचे पाऊल उचलले.

Swapnil S

जळगाव : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही इच्छुकांनी उमेदवारी मागे न घेता बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. हे बंडखोर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत भाजप नेतृत्वाने पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या तब्बल २७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्याचे पाऊल गुरुवारी उचलले.

शिस्तभंगाच्या कारवाईमुळे खळबळ

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून करण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या नावाचा आणि पक्षाच्या प्रतिमेचा गैरवापर करत काही अपक्ष उमेदवार हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. प्रचारादरम्यान संबंधित सर्व अपक्ष उमेदवार आणि त्यांचे समर्थक स्वतःला भाजपशी संबंधित असल्याचे भासवत असल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रक जारी करून पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली होती.

वाहतूकदारांचा राज्यव्यापी संप; बस-टॅक्सी सेवा ठप्प, शालेय विद्यार्थ्यांसह सर्वसामान्यांवर काय परिणाम?

Mumbai : India vs England सामन्यामुळे मरीन ड्राइव्ह परिसरात ट्रॅफिक अलर्ट; वाहतूक पोलिसांकडून पर्यायी मार्ग जाहीर, वाचा सविस्तर

Iran vs US-Israel War : मध्यपूर्वेतील संघर्षात वाढ; भारतीय नागरिकांसाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून हेल्पलाइन क्रमांक जारी

Mumbai : वानखेडेवर India vs England सेमीफायनल; चाहत्यांसाठी मेट्रोच्या अतिरिक्त फेऱ्या, पाहा वेळापत्रक

दारूच्या वादातून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या; म्हणाला "चुकून झालं", मृतदेह पाण्याच्या टाकीत टाकून बाहेर जाऊन खाल्ली बिर्याणी