महाराष्ट्र

राज्य विधिमंडळाच्या कामकाज दिवसांत घट; प्रश्न विचारण्याचे प्रमाणही ७३ टक्क्यांनी झाले कमी : रिपोर्ट

महाराष्ट्र विधानसभेत १२व्या विधानसभेच्या तुलनेत कामकाजाच्या दिवसांत ४३ टक्के, तर प्रश्न विचारण्याच्या प्रमाणात ७३ टक्के इतकी गंभीर घट झाली आहे.

Swapnil S

मुंबई : प्रजा फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेने मंगळवारी जाहीर केलेल्या अभ्यास अहवालानुसार, महाराष्ट्र विधानसभेत १२व्या विधानसभेच्या तुलनेत कामकाजाच्या दिवसांत ४३ टक्के, तर प्रश्न विचारण्याच्या प्रमाणात ७३ टक्के इतकी गंभीर घट झाली आहे.

विद्यमान १४व्या विधानसभेच्या कामकाजाविषयी ही बाब नमूद करताना संस्थेने राज्यातील ढवळून निघालेले वातावरण, प्रमुख पक्षांमधील फुटी आणि बदलती राज्य सरकारे यांचा उल्लेख केला आहे. याचा प्रतिकूल परिणाम विधिमंडळातील कामकाजावर झाल्याचे निरीक्षण संस्थेचे सीईओ मिलिंद म्हस्के, सहायक व्यवस्थापक एकनाथ पवार आणि नीलम मिराशी यांनी मांडले.

बाराव्या विधानसभेत २१० दिवस, तेराव्या विधानसभेत २०६ दिवस, तर विद्यमान चौदाव्या विधानसभेत ११९ दिवस कामकाज झाले. बाराव्या विधानसभेच्या तुलनेत तेराव्या विधानसभेच्या कामकाजाच्या दिवसांत दोन टक्के, तर चौदाव्या विधानसभेच्या कामकाजात ( हिवाळी सत्र २०१९ ते अर्थसंकल्पीय सत्र २०२४ ) ४३ टक्के घट झाली आहे. विशेष म्हणजे तीनही कालावधींत आमदारांच्या उपस्थितीचे एकूण प्रमाण ८८ टक्के, ८९ टक्के आणि ८९ टक्के इतके स्थिर राहिले आहे. पुढचा गंभीर मुद्दा म्हणजे आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांचा बाराव्या विधानसभेत ४० हजार ५१२, तेराव्या विधानसभेत २२ हजार ४०४ , तर चालू विधानसभेत ११ हजार १३२ इतके प्रश्न (७३ टक्के घट) आमदारांनी विचारले.

'वंदे मातरम्' चर्चेत मोदींच्या भाषणावर काँग्रेसचा हल्लाबोल; प्रियंका गांधी म्हणाल्या, “मोदी उत्तम भाषण देतात, पण...

'वंदे मातरम्' चर्चेतून राजकारण तापलं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; ‘वंदे मातरम्’वर भाजपचा दावा कशासाठी?

MPSC ची मोठी घोषणा : संयुक्त परीक्षांच्या तारखेत बदल; २१ डिसेंबरच्या मतमोजणीमुळे आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

नाशिक-मुंबई लोकलचे स्वप्न पूर्ण होणार! कसारा-मुंबई, मनमाड-कसारा मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनसाठी हिरवा कंदील

भारतातील रस्त्याला चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव; 'या' राज्याची मोठी घोषणा, भाजपकडून टीकेची झोड