तटकरे-पटेल भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील; रोहित पवारांचा दावा 
महाराष्ट्र

तटकरे-पटेल भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील; रोहित पवारांचा दावा

रोहित पवार यांनी महायुतीतील अंतर्गत संघर्षावर भाष्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह १२ आमदार आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

Swapnil S

पुणे : रोहित पवार यांनी महायुतीतील अंतर्गत संघर्षावर भाष्य करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासह १२ आमदार आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षच्या चिन्हावर निवडणूक लढवतील, असा खळबळजनक दावा त्यांनी केला.

पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना रोहित पवार यांनी अजित पवार गट, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली. तटकरे आणि पटेल यांच्यावर झालेल्या कारवाईचे स्वागत करताना त्यांनी, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता हे नेते भाजपच्या गळाला लागल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे म्हटले.

यावेळी रोहित पवार यांनी सुनील तटकरे यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांना आता सिल्व्हर ओकचा चहा आवडू लागला असावा, असा टोला लगावला.महायुतीतील मतभेद अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, केवळ राष्ट्रवादीच नव्हे, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही आमदारही भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये सुनील शेळके यांचेही नाव त्यांनी घेतले.

पॅलेट गन प्रकरणात FIR ची मागणी; पीडित विद्यार्थ्यासह राहुल गांधींचे पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन

जयपूरमध्ये शाळेच्या पाहणीदरम्यान CJP कार्यकर्त्यांवर हल्ला; धक्काबुक्की अन् गाड्यांची तोडफोड, Video व्हायरल

Mumbai : कुर्ल्यात पहाटे मोठी दुर्घटना! क्रेनचा भाग झोपड्यांवर कोसळला; ३ महिन्यांच्या बाळासह १० जण जखमी, VIDEO

ठाण्यातील कोलशेतमध्ये धूळ-माती, चिखलाचा कहर; बड्या विकासकांना महापालिकेचा दणका, नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

ST च्या भाडेवाढीचा गणेशभक्तांना फटका; तीव्र आंदोलन करण्याचा इशारा