सर्पदंशाच्या निदानासाठी ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट किट’ खरेदी; १ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

सर्पदंशाच्या निदानासाठी ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट किट’ खरेदी; १ कोटी २२ लाख रुपयांचा निधी मंजूर

राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सर्पदंशाचे जलद निदान करण्यासाठी ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट किट’ खरेदीसाठी राज्य सरकारने १ कोटी २२ लाख ८३ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांमध्ये सर्पदंशाचे जलद निदान करण्यासाठी ‘स्नेक व्हेनम रॅपिड टेस्ट किट’ खरेदीसाठी राज्य सरकारने १ कोटी २२ लाख ८३ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने गुरुवारी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.

२०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी संबंधित अर्थसंकल्पीय तरतुदीतून हा निधी उपलब्ध करून दिला असून, यातून या निदान किटची खरेदी केली जाणार आहे. यापूर्वी राज्यातील शासकीय आरोग्य संस्थांसाठी या किटच्या खरेदीसाठी ६ कोटी १४ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली. त्यापैकी अर्थ विभागाने अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध करून दिलेल्या रकमेपैकी २० टक्के म्हणजेच १ कोटी २२ लाख ८३ हजार रुपये खर्चासाठी मंजूर केले.

महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या मुख्य लेखा आणि वित्त अधिकाऱ्यांकडे हा निधी वर्ग करण्यात येणार असून, त्याचा वापर मंजूर उद्देशासाठीच करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आरोग्य मंत्री आबिटकर यांनी विधानसभेत बोलताना, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ‘अँटी-स्नेक व्हेनम डायग्नोस्टिक किट’ देण्याचे जाहीर केले होते.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली