महाराष्ट्र

दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा; दुधाला पाच रुपये प्रतिलिटर अनुदान निश्चित: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील १० महत्वाचे निर्णय

या बैठकीत नांदेड-बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देण्यासाठी ७५० कोटींच्या निधीला मान्यता देण्यात आली आहे.

Rakesh Mali

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. यात बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. यात अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चिर निश्चित करण्यात आला असून कारसाठी २५० रुपये टोल आकारला जाणार आहे. तसेच, दुधाला पाच रुपये प्रतिलिटरचे अनुदान देण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला आहे. यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य या बैठकीला उपस्थित होते.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेले महत्वाचे निर्णय

  • नोव्हेंबर २००५ पूर्वीच्या जाहिरातीनुसार नोव्हेंबर २००५ नंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्ती वेतन योजनेचा पर्याय. कर्मचाऱ्यांना दिलासा

  • अटलबिहारी वाजपेयी शिवडी न्हावाशेवा अटल सेतूसाठी पथकर निश्चित. कारसाठी २५० रुपये

  • दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. दुधासाठी ५ रुपये प्रति लिटर अनुदान

  • विदर्भातील सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा-नळगंगा प्रकल्पास पाणी उपलब्धतेची अट शिथिल करणार

  • मंत्रालयीन लिपिक टंकलेखकांना दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता

  • पॉवरलूमला प्रोत्साहन देण्यासाठी इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टरला भांडवली अनुदान ४०० उद्योगांना फायदा

  • रेशीम उद्योगाच्या विकासासाठी "सिल्क समग्र २" योजना राबविणार. रेशीम शेतकऱ्यांना मोठा लाभ

  • द्राक्ष उत्पादकांच्या हिताची वाईन उद्योगास प्रोत्साहन योजना सात वर्षांसाठी राबविणार

  • नांदेड - बिदर नवीन ब्रॉडगेज प्रकल्पाला वेग देणार. ७५० कोटीस मान्यता

  • सहकारी संस्थांच्या अधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास प्रस्तावासाठी कालावधी वाढवला

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी