Pune : सिया गोयलच्या भावावर १० कोटींचा मानहानीचा दावा; साहिलचे आरोप तथ्यहीन - ॲॅड. आशुतोष श्रीवास्तव 
महाराष्ट्र

Pune : सिया गोयलच्या भावावर १० कोटींचा मानहानीचा दावा; साहिलचे आरोप तथ्यहीन - ॲॅड. आशुतोष श्रीवास्तव

लोहगड येथील बहुचर्चित बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने आता एक वेगळेच आणि अनपेक्षित कायदेशीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वकील असल्याचा दावा करणाऱ्या ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी चक्क सियाचा भाऊ साहिल गोयल यालाच १० कोटी रुपयांची कायदेशीर मानहानीची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे.

Swapnil S

पुणे : लोहगड येथील बहुचर्चित बांधकाम व्यावसायिक केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने आता एक वेगळेच आणि अनपेक्षित कायदेशीर वळण घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल हिचे वकील असल्याचा दावा करणाऱ्या ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी चक्क सियाचा भाऊ साहिल गोयल यालाच १० कोटी रुपयांची कायदेशीर मानहानीची नोटीस बजावल्याने खळबळ उडाली आहे. साहिल गोयल यांनी केलेले आरोप तथ्यहीन असून त्यामुळे आपल्या अनेक वर्षांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला मोठा धक्का पोहोचला असल्याचा दावा श्रीवास्तव यांनी या नोटिशीद्वारे केला आहे.

वडगाव मावळ न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना वकिलांच्या नियुक्तीवरून मोठा गदारोळ पाहायला मिळाला. आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याने न्यायालयात आणि माध्यमांशी बोलताना आशुतोष श्रीवास्तव यांच्यावर गंभीर आरोप केले होते. श्रीवास्तव हे आमचे वकील नसून कुटुंबाने त्यांना कोणतीही अधिकृत नियुक्ती दिलेली नाही, असा दावा साहिल यांनी केला.

श्रीवास्तव यांनी पोलीस कोठडीत फसवणूक करून सियाची स्वाक्षरी घेतली असावी आणि आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिली, असा खळबळजनक आरोपही साहिल यांनी केला. कुटुंबाने आपल्या बाजूसाठी केवळ ॲडव्होकेट विपुल दुशिंग यांची नियुक्ती केली असून त्यासंदर्भात न्यायालयात प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आले आहे. खुद्द सिया गोयलनेही न्यायालयात ‘माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत,' असे स्पष्ट केले.

या आरोपांना उत्तर देताना ॲड. श्रीवास्तव यांनी आक्रमक पवित्रा घेत साहिल गोयल यांना १० पानांची कायदेशीर नोटीस पाठवली आहे. साहिल यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून त्यांनी १५ दिवसांच्या आत जाहीर माफी मागावी आणि १० कोटींची रक्कम नुकसान भरपाई म्हणून भरावी, अशी मागणी या नोटिशीत करण्यात आली आहे.

श्रीवास्तव यांच्या दाव्यानुसार, त्यांची टीम सिया गोयलकडे गेली होती आणि तिला कायदेशीर मदतीची गरज असल्याने तिने स्वतः सज्ञान म्हणून आवश्यक कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या केल्या आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Mumbai : मुलुंडमध्ये बांधकामाधीन इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट, परिसरात धुराचे लोट, Video व्हायरल

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल

SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम