महाराष्ट्र

मनोज जरांगेंसोबत तिसऱ्या आघाडीसाठी संभाजीराजेंची फिल्डिंग

सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर विधानसभेत २८८ उमेदवार उतरवण्याचा निर्णय २९ ऑगस्टला जाहीर करणार, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे.

Swapnil S

कोल्हापूर : सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर विधानसभेत २८८ उमेदवार उतरवण्याचा निर्णय २९ ऑगस्टला जाहीर करणार, असे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे जरांगे यांनी विधानसभेच्या रिंगणात उडी घेतल्यास, त्यांच्यासोबत तिसरी आघाडी करण्यासाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी फिल्डिंग लावली आहे. यासंदर्भात लवकरच मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत बोलणी करणार असल्याचेही संभाजीराजेंनी सांगितले.

समाजामध्ये काम करत असताना जरांगे पाटील यांचे उद्दिष्ट आणि माझा उद्देश एकच आहे. त्यामुळे आम्ही एकत्र येऊन काम करणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याबाबत आपली आणि मनोज जरांगे पाटील यांची अद्याप चर्चा झालेली नाही. मात्र, यासंदर्भात आपण लवकरच चर्चा करू, असेही ते म्हणाले. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण दिले नाही तर राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता