महाराष्ट्र

सांगली महापालिकेत राष्ट्रवादीसोबत आघाडी करू; पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे संकेत

सांगली महापालिकेच्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी हळूहळू रंगत असून भाजपने आतापासूनच ७८ जागांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महायुतीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीबाबतही सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.

Swapnil S

सांगली : सांगली महापालिकेच्या आगामी निवडणुकांची रणधुमाळी हळूहळू रंगत असून भाजपने आतापासूनच ७८ जागांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महायुतीचा विस्तार करण्याच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडीबाबतही सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले आहेत.

महापालिकेच्या निवडणुका जरी लांब असल्या तरी भाजपने तयारी आत्ताच सुरू केली आहे. आमदार सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, शेखर इनामदार आणि जयश्री पाटील यांना ७८ प्रभागांसाठी उमेदवारांची क्षमता, लोकमान्यता आणि जनसमर्थनाची स्थिती जाणून घेण्यासाठी चाचपणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीबाबत ते म्हणाले, "महायुतीतील घटक पक्ष राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू आहे. एकत्र येण्याची आमची इच्छा आहे आणि योग्य जागांवर समन्वय साधला जाईल.

काँग्रेसचा पराभव निश्चित

पलूस नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी (अजित पवार गट) सोबत चर्चा सुरू असून सर्वेक्षणात भाजपला २७टक्के आणि राष्ट्रवादीला १७ टक्के कौल मिळाल्यामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता पाटील यांनी व्यक्त केली. विटा नगरपालिकेतही महायुतीमध्ये कोणताही वाद नसून एक पक्षाचा नगराध्यक्ष तर दुसऱ्याच उपनगराध्यक्ष असा पर्याय अंतिम केला जाणार आहे. नगरपालिकांच्या सर्व निवडणुकांत महायुती एकत्र राहील आणि काँग्रेसचा पराभव निश्चित होईल, असा ठाम विश्वास चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

Bihar Politics : यादव कुटुंब कलह तीव्र; रोहिणी आचार्य यांचे गंभीर आरोप, म्हणाल्या, "घाणेरड्या शिव्या दिल्या, चप्पल उगारली...

न्यायालयाच्या वेळेचे मूल्य एक लाख! वेळ वाया घालविल्याबद्दल शेतकरी कुटुंबियाला दणका

Solapur : धक्कादायक! "कोणी माझी आठवण नाही काढली पाहिजे"; स्टोरी ठेवत तरुणाची आत्महत्या

विद्यार्थ्यांसाठी मोठी भेट! शालेय सहलींसाठी राज्य परिवहनच्या नवीन बसेस; भाड्यात तब्बल ५०% सवलत

ठाण्यात पाळीव प्राण्यांसाठी पहिली गॅस शवदाहिनी