महाराष्ट्र

Sangli : सांगलीत भाजप नगरसेवकाची हत्या; परिसरात एकच खळबळ

सांगलीतील (Sangli) जतमध्ये भाजप (BJP) नगरसेवकाची हत्या झाल्याची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे

प्रतिनिधी

सांगली (Sangli) जिल्ह्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जतमध्ये एका भाजप (BJP) नगरसेवकाची हत्या करण्यात आली आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, भाजप नगरसेवक विजय ताड यांची गाडी काही हल्लेखोरांनी रस्त्यात अडवून त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, ताड समर्थकांनी यावेळी मोठी गर्दी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे नगरसेवक विजय ताड हे आपल्या गाडीतून मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाले होते. यावेळी सांगोला रोडवरील अल्फोन्सो स्कूलजवळ त्यांची गाडी काही अज्ञात व्यक्तींनी अडवली. गाडीवर हल्ला करत त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये त्यांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. ही बातमी मिळताच ताड समर्थकांनी गर्दी करण्यात सुरुवात केली. दरम्यान, या हल्ल्यामागे काय कारण आहे? आणि आणि कोणी केला? हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.

महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळ प्रकरणात बृजभूषण शरण सिंह निर्दोष; दिल्ली न्यायालयाचा मोठा निर्णय

आयटीमध्ये आता नवीन रोजगार नाही; AI आणि डेटा सेंटर उभारणीसाठी गुंतवणूक होत आहे - श्रीधर वेम्बू

CSMT वर स्मार्ट डिजिटल डिस्प्ले प्रणाली; गाडीची अद्ययावत माहिती एका नजरेत उपलब्ध

'लायन'ची सहा दशकांनी भारतात वापसी; प्रीमियम बिअरसह ब्रिटिश बीअर उत्पादकाचा दिल्लीच्या बाजारात प्रवेश

Jalgoan : सातपुडा जंगल सफारीची वर्षपूर्ती; पर्यटकांचा उदंड प्रतिसाद, स्थानिकांना रोजगाराची संधी