अजित पवार यांचे संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

सांगलीत पोलिसांचा दणका; अजित पवारांच्या उमेदवारासह ८ जण हद्दपार

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

Swapnil S

सांगली : सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगली पोलिसांनी हद्दपारीची मोठी कारवाई केली आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रभाग क्रमांक ६ मधील सर्वसाधारण गटातील उमेदवार आझम काझीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. तसेच आझम काझीसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणच्या टोळीतील आठ जणांवर हद्दपारीची कारवाई झाली.

या सर्वांना सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. शुक्रवारी ९ जानेवारी रोजी मिरजमध्ये अजित पवार यांची सभा होत असताना या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार दिल्याने भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये एकमेकावर गेल्या काही दिवसांपासून जोरदार टीका होत होती.

कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ

कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चारजण, आटपाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन, विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोघावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी हे आदेश दिले आहेत. ऐन निवडणुकीत झालेल्या या कारवाईमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पालिका निवडणूक तसेच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी, Video

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली मेट्रोचा खास अंदाज; 'हर घर तिरंगा' थीमवर साकारली विशेष ट्रेन