महाराष्ट्र

सांगली रेल्वे स्थानकाला लाभली पहिली एक्स्प्रेस, प्रवाशांना दिलासा

सांगली स्थानकातून आतापर्यंत केवळ पॅसेंजर गाड्या सुटत होत्या.

Swapnil S

कराड : मिरजेतून सुटणारी मिरज-बंगळुरु राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस व परळी-मिरज डेमूचा सांगलीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. यामुळे सांगली स्थानकातून सुटणारी राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस ही पहिलीच एक्स्प्रेस ठरली आहे. परळी-मिरज डेमूसुद्धा सांगलीतून धावण्यास सुरुवात झाल्याने सांगलीतील प्रवाशांची सोय झाली असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

गेली २५ वर्षे मिरजेतून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार करण्यात आला असल्यामुळे सांगली स्थानकाची निर्मिती झाल्यापासून प्रथमच या स्थानकातून एखादी एक्स्प्रेस धावत आहे. सांगली स्थानकातून आतापर्यंत केवळ पॅसेंजर गाड्या सुटत होत्या. सांगलीपासून केवळ दहा किलोमीटर अंतरावर मिरज जंक्शन असल्याने सर्व एक्स्प्रेस मिरजेतून सोडण्यात येतात. मिरजेतून सुटणाऱ्या राणी चेन्नम्मासह इतर काही एक्स्प्रेस गाड्या कोल्हापुरात नेण्यात आल्या. मात्र जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या सांगली स्थानकातून एकही एक्स्प्रेस सोडण्यात आली नव्हती. आता राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीपर्यंत विस्तार झाल्याने सांगली स्थानकालाही एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात जागा मिळाली आहे.

Mumbai : धरणांतील पाणीसाठा घटला; BMC चे नवे नियम जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

आता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळेल कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

सौरव गांगुलींकडून फेसबुक पेजविरोधात तक्रार दाखल; खोटी माहिती पसरवल्याचा आरोप