सोशल मीडिया
महाराष्ट्र

Sanjana Jadhav Accident : रावसाहेब दानवेंच्या मुलीच्या कारला अपघात

माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांच्या गाडीला सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्यावर समोरुन येणाऱ्या एका पिकअपने जोरदार धडक दिली.

Swapnil S

कन्नड : माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कन्या आणि माजी जिल्हा परिषद सदस्या संजना जाधव यांच्या गाडीला सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्यावर समोरुन येणाऱ्या एका पिकअपने जोरदार धडक दिली. सुदैवाने या अपघातात संजना जाधव थोडक्यात बचावल्या आहेत.

संजना जाधव आपल्या चार कार्यकर्त्यांसोबत कन्नड तालुक्यातील बनोटी सर्कलमधील वरठाण या ठिकाणी आपल्या कारने जात होत्या. चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव फाट्याजवळ आल्यानंतर समोरून आलेल्या पिकअपने संजना यांच्या गाडीला समोरून चालकाच्या बाजूने जोराची धडक दिली. सुदैवाने या अपघातात संजना जाधव, बाजार समितीचे उपसभापती जयेश बोरसे, माजी सरपंच ज्ञानेश्वर निकम, आदित्य गर्जे यांना कोणतीही इजा झाली नाही.

धडक देणाऱ्या पिकअपचा चालक हा गांजा ओढून आणि दारू पिऊन गाडी चालवत होता, अशी माहिती पोलिसांना दिली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक अपघातस्थळी आले व त्यांनी पिकअप अडवत चालकाला बाहेर ओढले आणि चांगलाच चोप दिला.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली