महाराष्ट्र

संजय निरुपम उद्या शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार

निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री शिंदे आणि संजय निरुपम यांच्यामध्ये चर्चा झाली.

Swapnil S

मुंबई : माजी खासदार व काँग्रेस नेते संजय निरुपम हे ३ मे रोजी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.

निरुपम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री शिंदे आणि संजय निरुपम यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर संजय निरुपम हे शिवसेना शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार असल्याची माहिती देण्यात आली.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भेटीसाठी बोलावले होते. शुक्रवारी ३ मे रोजी दुपारी आपण शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहे. या प्रवेशाची अन्य माहिती पक्षाकडून देण्यात येईल. तसेच पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षाचे जेवढे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांच्यासाठी आपण प्रचार करणार असून शिवसेनेचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे”, अशी प्रतिक्रिया संजय निरुपम यांनी दिली.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली