सप्तश्रृंगीगडाजवळ भीषण अपघात 
महाराष्ट्र

सप्तश्रृंगीगडाजवळ भीषण अपघात; इनोव्हा कार थेट दरीत; ६ भाविकांचा मृत्यू

सप्तश्रृंगीगड येथील गणपती घाटात एक इनोव्हा कार हजार ते १२०० फुट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पिंपळगांव बसवंत येथील सहा जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून, कारमध्ये एकूण सात प्रवासी होते.

Swapnil S

लासलगाव : सप्तश्रृंगीगड येथील गणपती घाटात एक इनोव्हा कार हजार ते १२०० फुट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात पिंपळगांव बसवंत येथील सहा जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेत चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून, कारमध्ये एकूण सात प्रवासी होते.

पिंपळगांव बसवंत येथील कुटुंब रविवारी दुपारी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी जात असताना गणपती पॉइंटजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार संरक्षक कठडा तोडून थेट खोल दरीत कोसळली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने बचावकार्य सुरू केले. आपत्ती व्यवस्थापनाकडून दरीतून मृतदेह बाहेर काढताना दरीची प्रचंड खोली आणि दुर्गम भागामुळे मदतकार्यात मोठी अडचण येत होती.

अपघातात कारमधील कीर्ती पटेल (वय ५०), रसीला पटेल (५०), विठ्ठल पटेल (६५), लता पटेल (६०), पचन पटेल (६०) आणि मणिबेन पटेल (६०, सर्व राहणार पिंपळगाव) यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर तीव्र नाराजी व्यक्त केली. घाटाच्या काही भागातील संरक्षक भिंतींचे काम अपूर्ण असल्यामुळे हा अपघात घडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. संरक्षणाची पुरेशी व्यवस्था नसताना या रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने दुर्घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या भीषण अपघातामुळे पिंपळगांव व सप्तश्रृंगीगड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

'वंदे मातरम्' चर्चेत मोदींच्या भाषणावर काँग्रेसचा हल्लाबोल; प्रियंका गांधी म्हणाल्या, “मोदी उत्तम भाषण देतात, पण...

'वंदे मातरम्' चर्चेतून राजकारण तापलं, आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल; ‘वंदे मातरम्’वर भाजपचा दावा कशासाठी?

MPSC ची मोठी घोषणा : संयुक्त परीक्षांच्या तारखेत बदल; २१ डिसेंबरच्या मतमोजणीमुळे आयोगाचा महत्त्वाचा निर्णय

नाशिक-मुंबई लोकलचे स्वप्न पूर्ण होणार! कसारा-मुंबई, मनमाड-कसारा मार्गांवर प्रत्येकी दोन नवीन रेल्वे लाईनसाठी हिरवा कंदील

भारतातील रस्त्याला चक्क डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव; 'या' राज्याची मोठी घोषणा, भाजपकडून टीकेची झोड