महाराष्ट्र

सातारा : बालविवाहाविरोधात प्रशासन ॲक्शन मोडवर; कठोर कारवाईचा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांचा इशारा

भारतीय संस्कृतीत विवाह हा महत्त्वाचा आणि सार्वत्रिक संस्काराचा भाग आहे. याकरिता शुभमुहूर्तावर विवाह विधी आयोजित करण्यात येतात.

Swapnil S

कराड : भारतीय संस्कृतीत विवाह हा महत्त्वाचा आणि सार्वत्रिक संस्काराचा भाग आहे. याकरिता शुभमुहूर्तावर विवाह विधी आयोजित करण्यात येतात. यामध्ये 'अक्षय्य तृतीया' या मुहूर्तावर सामुदायिक तसेच वैयक्तिक विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर असून साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बालविवाह करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. दरम्यान, बालविवाह करणाऱ्यांची गय केली जाणार नाही व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. विवाहाशी संबंधित सेवा पुरवठाधारक (उदा. धार्मिक पुजारी, प्रिंटीग प्रेसचे मालक, मंडपवाला, विवाह हॉलचे व्यवस्थापक, केटरर्स, संगीत बँड आणि सजावट करणारे इ.) यांनी विवाहापूर्वी मुलाचे वय २१ वर्ष व मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असल्याबाबतचा वयाचा पुरावा घेऊन तशी वयाबाबत खात्री करणे आवश्यक आहे. अन्यथा बालविवाह घडल्यास संबंधित सेवा पुरवठाधारकांवरही सदर बालविवाह प्रतिबंध अन्वये कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले आहेत.

मागील वर्षभरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड हेल्प लाइन कक्षाने २२ बालविवाह रोखले असून ३ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम नुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.कराड : भारतीय संस्कृतीत विवाह हा महत्त्वाचा आणि सार्वत्रिक संस्काराचा भाग आहे. याकरिता शुभमुहूर्तावर विवाह विधी आयोजित करण्यात येतात. यामध्ये 'अक्षय्य तृतीया' या मुहूर्तावर सामुदायिक तसेच वैयक्तिक विवाह समारंभ आयोजित केले जातात. यामध्ये बालविवाहांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर होणारे बालविवाह रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर असून साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बालविवाह करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

दरम्यान, बालविवाह करणाऱ्यांची गय केली जाणार नाही व कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. विवाहाशी संबंधित सेवा पुरवठाधारक (उदा. धार्मिक पुजारी, प्रिंटीग प्रेसचे मालक, मंडपवाला, विवाह हॉलचे व्यवस्थापक, केटरर्स, संगीत बँड आणि सजावट करणारे इ.) यांनी विवाहापूर्वी मुलाचे वय २१ वर्ष व मुलीचे वय १८ वर्ष पूर्ण असल्याबाबतचा वयाचा पुरावा घेऊन तशी वयाबाबत खात्री करणे आवश्यक आहे. अन्यथा बालविवाह घडल्यास संबंधित सेवा पुरवठाधारकांवरही सदर बालविवाह प्रतिबंध अन्वये कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी पाटील यांनी दिले आहेत.

मागील वर्षभरामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाइल्ड हेल्प लाइन कक्षाने २२ बालविवाह रोखले असून ३ प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बालविवाह प्रतिबंध अधिनियम नुसार ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

चाइल्ड हेल्पलाइन टोल फ्री

नागरिकांना बालविवाह निदर्शनास आल्यास ग्रामस्तरावर ग्रामसेवक तसेच शहरी भागामध्ये बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना माहिती द्यावी किंवा बालविवाह रोखण्यासाठी चाइल्ड हेल्पलाइन टोल फ्री क्रंमाक १०९८ अथवा ११२ या क्रमांकावर माहिती नोंदवावी,सदर माहिती ही गोपणीय ठेवली जाईल, याबाबतची कार्यवाही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्यामार्फत केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. बालविवाहाबाबत शासनाने मोठ्या प्रमाणात जनजागृती केली असून देखील त्याकडे दुर्लक्ष होत आहे.

AI समिटमध्ये मोठी नाचक्की! चिनी रोबोटला स्वतः डेव्हलप केल्याचं सांगितलं; 'तात्काळ एक्स्पो स्थळ सोडा' - गलगोटिया विद्यापीठाला आदेश

Thane : मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहनचालकांना दिलासा; साकेत उड्डाणपूल वाहतुकीसाठी अखेर खुला

Mumbai : स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट समितीसाठी आज अर्ज दाखल होणार

Mumbai : रस्ते खड्ड्यात घालणाऱ्या कंत्राटदारांना ३७ कोटींचा दंड; वसुली केवळ १६ कोटींची

जागतिक ‘एआय’ परिषदेत गर्दी, गोंधळ; केंद्रीय मंत्र्यांवर माफी मागण्याची वेळ