पर्यावरण मंत्र्यांचे पर्यावरणाचे ज्ञान शून्य; कर्जतमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचे टीकास्त्र 
महाराष्ट्र

पर्यावरण मंत्र्यांचे पर्यावरणाचे ज्ञान शून्य; कर्जतमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचे टीकास्त्र

मंत्र्यांना खातेवाटप करताना त्या खात्याची माहिती असणे गरजेचे असते. हजारो झाडांची कत्तल सुरू असताना पर्यावरण मंत्री गप्प आहेत.

प्रतिनिधी

विजय मांडे

कर्जत : मंत्र्यांना खातेवाटप करताना त्या खात्याची माहिती असणे गरजेचे असते. हजारो झाडांची कत्तल सुरू असताना पर्यावरण मंत्री गप्प आहेत. कारण त्यांचे पर्यावरणाचे ज्ञान शून्य आहे, अशी जोरदार टीका अभिनेते सयाजी शिंदे यांनी केली.

कर्जत पालीतर्फे कोतवाल खलाटी येथील सायडोंगर येथे वृक्षांची कत्तल पाहिल्यानंतर अभिनेते आणि पर्यावरणप्रेमी सयाजी शिंदे यांचा संताप अनावर झाला. अभिनेते शिंदे यांच्यासोबत कर्जत पर्यावरण बचाव समितीचे समन्वयक अॅड. कैलास मोरे होते.

ते म्हणाले की, आमदार, खासदाराच्या निधनानंतर शोकसभा होते. झाडे तोडल्यावर शोकसभा होत नाही. पण आपली ही झाडे ऑक्सिजन देणारी आहेत. त्यांना मारले गेल्याने मी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली वाहायला आलो आहे. लाखो लोकांनी या आंदोलनात उतरले पाहिजे आणि टोरेंट कंपनीच्या गाड्या अडवा.' असे आवाहन शिंदे यांनी केले.

ते म्हणाले की, 'येथील जुनी झाडे तोडली गेल्याने प्राणी पक्षांचा अमानुष छळ सुरू झाला आहे. पक्षाची प्रजननाची वेळही झाड तोडणाऱ्यांनी पाहिली नाही. महाराष्ट्रात असे प्रकल्प आपल्याला नकोत. वृक्ष तोड रोखण्यासाठी सर्वांची एकजूट असायला हवी, असे त्यांनी सांगितले.

झाडाचे रक्त आजही वाहत असल्याचे पाहून सयाजी शिंदे यांनी हळवे होत नाराजी व्यक्त केली आणि सत्ताधाऱ्यांनी इकडे येऊन पाहावे, असे आवाहन केले.

सूर्यप्रकाश असूनही आपण घरात कोंडून घेत आहोत. एवढी मोठी उर्जा मोफत असताना हरित ऊर्जेची गरज काय? जंगल तोडू नका एवढेच आपले म्हणणे असून जंगल तोडून प्रकल्प होणार असतील आणि नोकऱ्या देण्याचे आमिष दाखवत आहेत हे केवळ थोतांड आहे. मी स्वतः प्रकल्पग्रस्त असून मलाही चौकीदार म्हणुन नोकरी करावी लागली होती, असे शिदि यांनी सांगितले.

झाडांवर ८० प्रकारचे पक्षी राहतात, अशी झाडे आपल्याला १०० वर्षात मिळणार आहेत काय? पक्षांचे जीवन आपण संपवणार आहोत काय? पक्षाचे अन्न देणारी झाडे नष्ट करून पक्षांना बेवारस करणार आहोत काय? असा सवाल सरकारला विचारला.

बुरशी बनवणारे हे जंगल आहे. त्या बुरशीवर पक्षांना अन्न मिळते, मात्र जंगल नष्ट झाले तर पक्षीही नष्ट होतील. घरावर बॉम्ब टाकल्यासारखे वाटत असून झाडे तोडल्याने त्यांचे मरण जवळ आणत आहोत, असे त्यांनी सांगितले.

कोट्यवधी झाडे कुठे लावली ?

शासनाने कोटी झाडे लावली आहेत असे सांगितले पण ती झाडे आहे कुठे असा प्रश्न करीत आहेत. झाडे तोडून आपले ऑक्सिजन संपुष्टात आणत आहोत आणि वाळवंट करीत आहोत. झाडे तोडली जात आहेत आणि त्यामुळे यंदा आपण दिवाळी साजरी करायची नाही, असे आवाहन त्यांनी केले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

आणीबाणी ही चूक; सोनिया गांधी यांचे विधान, इंदिराजींनाही खंत वाटल्याचा मुलाखतीत दावा

गोकुळमध्ये रस नाही; सरकारी संचालक नेमण्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली; 'कौन बनेगा करोडपती'चं शूटिंग थांबवलं

बिश्नोईचा मुख्य हस्तक हॅरी बॉक्सर अमेरिकेत ताब्यात; रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबाराचा सूत्रधार