संग्रहित छायाचित्र 
महाराष्ट्र

नवाब मलिकांना दिलासा; वैद्यकीय जामीन २ आठवड्यांनी वाढवला

माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात आलेला जामीन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : माजी मंत्री नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणास्तव मंजूर करण्यात आलेला जामीन आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर शुक्रवारी या जामिनाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे नवाब मलिक यांना पुन्हा जेलमध्ये जावे लागणार का, याबाबत चर्चा रंगली होती. मात्र, शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांच्या जामिनामध्ये दोन आठवड्यांसाठी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, ईडीकडून त्यांच्या वकिलांना न्यायालयामध्ये कोणती भूमिका घ्यायची याबाबत कोणतीही सूचना नसल्याने जामीन वाढवत असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.

नवाब मलिक यांना २०२२मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. नवाब मलिकांवर अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांसोबत पैशांच्या व्यवहाराचा आरोप आहे. डॉन दाऊद इब्राहिमसोबत पैशाचे व्यवहार आणि त्याच्या बहिणीसोबतच्या जमिनीच्या व्यवहाराचा ईडीचे पथक तपास करत आहे. याप्रकरणी नवाब मलिक हे अनेक दिवस तुरुंगात होते आणि काही दिवसांपूर्वीच त्यांना वैद्यकीय आधारावर जामीन मंजूर करण्यात आला होता.

ओबीसी आरक्षणाला धक्का नाही! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही; नोंदी असलेल्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार

‘देवाभाऊ’ कॅम्पेनवरून जोरदार वादंग; जाहिरात देणारा भाजपच्या मित्रपक्षाचा मंत्री - रोहित पवार

मुंबईला मिळणार वातानुकूलित वंदे मेट्रो; २ हजार ८५६ डब्यांच्या खरेदीची निविदा जाहीर

निवडणूक आयोग भाजपचे कार्यालय बनले का? मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

अस्तित्व वाचवण्यासाठी ओमी कलानींची धडपड; अखेर युतीसाठी शिंदे गटाचा दरवाजा ठोठावला