महाराष्ट्र

Karad : शालेय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

तबला पेटी वाजवण्याचा क्लाससाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला असून शंभूराज शशिकांत राजमाने (९) असे त्या मुलाचे नाव आहे.

Swapnil S

कराड : तबला पेटी वाजवण्याचा क्लाससाठी गेलेल्या एका शाळकरी मुलाचा मृतदेह शेततळ्यात आढळून आला असून शंभूराज शशिकांत राजमाने (९) असे त्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद दहिवडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शशिकांत राजमाने यांचा एकुलता एक मुलगा

शंभूराज मंगळवारी दुपारी तबला आणि पेटी वादनाच्या क्लासला गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून पालकांनी नलवडे व त्यांच्या मुलांना विचारले असता तो आज क्लासला आला नाही, असे सांगण्यात आले.

त्यावेळी शंभूराजच्या पालकांनी शोधाशोध केल्यानंतर तो नलवडे यांच्या घरामागे असणाऱ्या शेततळ्यात पडून मृत्यू झाल्याचे आढळून आले. या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे.

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

राज्यात दोन दिवस वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाने वर्तविला अंदाज

...आणि आता तेलही! युद्धामुळे भारतातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम

मुंबईची तुंबई होणार; मिठी नदीच्या सफाईसाठी कंत्राटदारच नाही, स्थायी समितीत सदस्य आक्रमक

LPG ची टंचाई कायमच; केंद्र सरकारची कबुली, PNG स्वीकारण्याचाही सल्ला