Sharad ponkshe 
महाराष्ट्र

ते पाहिल्यावर स्वा.सावरकर पदोपदी आठवतात व त्यांचे विचार आठवतात - शरद पोंक्षे

याच विषयावर शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी...

विक्रांत नलावडे

मराठी अभिनेता शरद पोंक्षे हे आपल्या नाटक, मालिका या कामांव्यतिरिक्त ही चर्चेत असतात. सोशल मिडीयाच्या माध्यमातुन ते आपले बेधडक मतप्रदर्शन करताना दिसतात. चालू घडामोडी, राजकीय हालचाल किंवा समाजातील एखादी त्यांना खटकलेली गोष्ट याचा ते यथेच्छ समाचार घेतात. नुकतंच राजस्थानमधील उदयपूर मध्ये दिवसाढवळ्या दोन लोकांनी कन्हैया लाल या युवकाचा गळा चिरुन हत्या केल्याची घटना आपण माध्यमांमध्ये पाहिली. संपूर्ण देशामध्ये या घटनेने खळबळ उडाली आहे. याच विषयावर शरद पोंक्षे यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमधून त्यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांची नेटकऱ्यांना आठवण करून दिली आहे. 

काय आहे पोस्टमध्ये ? 

'प्रेयसीच्या केसातून फिरणारी बोटे जर बंदुकीच्या चापावरुन फिरु लागली तर आणि तरच कदाचित हा हिंदुस्थान जगू शकेल' अशा आशयाचा सावरकरांचा एक संदेश असलेला फोटो पोंक्षे यांनी पोस्ट केला आहे. जे उदयपूरमध्ये घडले ते पाहिल्यावर स्वा.सावरकर पदोपदी आठवतात व त्यांचे विचार आठवतात. हिंदूंनो जागे व्हा. असे कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिले आहे. त्यांच्या या पोस्टला मोठ्या प्रमाणावर व्हायरल केले जात असून त्यांच्या रोखठोक मताचे कौतुकदेखील केले जात आहे. 

दोनच दिवसांपूर्वी आदेश बांदेकरांसोबत जुंपले होते ट्विटर वॉर 

शरद पोंक्षे लिखित पुस्तकामध्ये त्यांनी त्याच्या कॅन्सर निदानच्या दरम्यानच्या प्रवासाचे वर्णन करताना एकनाथ शिंदे यांचे आभार मानले होते, मात्र याचाच आधार घेऊन संपूर्ण माहिती न घेता आदेश बांदेकर यांनी पोंक्षे यांना ' तू तोच शरद पोंक्षे आहेस ना ?' असा प्रश्न विचारत एक जुना फोटो पोस्ट केला होता. याचे उत्तर देताना शरद पोंक्षे यांनी त्या संपूर्ण मथळ्याचा फोटो आदेश बांदेकर यांना ट्विट करत, शरद पोंक्षे काही विसरत नाही असे उत्तर दिले.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री