महाराष्ट्र

२४ तासांमध्ये ४ अपघात, चौपदरीकरणानंतरही कशेडी घाटात अपघातांची मालिका सुरूच

Swapnil S

पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटामध्ये गेल्या २४ तासांमध्ये ४ अपघात झाल्यानंतर अपघातांची तीव्रता महामार्गाच्या चौपदरीकरणानंतरही कायमच राहिल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. मंगळवारी सकाळी ११ वाजता गोवा-पनवेल बसला मागून भरधाव वेगाने येणाऱ्या रत्नागिरी-वसई बसने धडक दिली. याप्रकरणी एसटी बसचालक सिध्दार्थ बडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच चोळई गावाच्या हद्दीमध्ये कशेडी घाटाच्या तीव्र उतारावर मशनरी घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या संरक्षक कठड्यालगत क्लिनरसाईडला धडकला. बुधवारी सकाळी एक टँकर रस्त्याच्या संरक्षक भिंतीलगत कलंडला. काही तासांतच आणखी दोन ट्रक सकाळी कलंडलेल्या टँकरच्या मागील भागात कलंडल्याने अपघाताचे चित्र कायम राहिले.

युनिस आगा यांनी फिर्याद दिल्यानुसार त्यांच्या ताब्यातील बस गोवा-पनवेल अशी फेरी करत असताना मागील बाजूने भरधाव वेगाने येणाऱ्या रत्नागिरी-वसई एसटी बसने धडक दिली. यावेळी वाहतूक पोलीस धायगुडे, पोलीस हवालदार जागडे यांनी पंचनामा करून एसटी बसचालक सिध्दार्थ बडे याच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.

मंगळवारी दुपारी चोळई गावाच्या हद्दीमध्ये कशेडी घाटाच्या तीव्र वळण उतारावर मशिनरी घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक रस्त्याच्या संरक्षक कठड्यालगत असलेल्या क्लिनरसाईडला कलंडला. बुधवारी सकाळी एक टँकर रस्त्याच्या संरक्षक भिंतीलगत कलंडला. काही तासातच आणखी दोन ट्रक सकाळी कलंडलेल्या टँकरच्या मागील भागात कलंडल्याने चोळई येथील कशेडी घाटातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणानंतर झालेल्या अपघातांची संख्या चार झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त