महाराष्ट्र

आमदार शहाजी बापू पाटीलांच्या ताफ्यातील गाडीला अपघात; एकाच मृत्यू

शिवसेना शिंदे गटाचे प्रसिद्ध आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीचा सांगोलामध्ये भीषण अपघात

प्रतिनिधी

शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला आज भीषण अपघात झाला. ही घटना सांगोला तालुक्यातील नाजरा गावाजवळ घडली. या अपघातात दुर्दैवाने एकाच जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. नाजरा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त आयोजित एका शिबिरासाठी आमदार शहाजी बापू गेले होते. तिथून सांगोला शहराकडे येताना हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार शहाजी बापू यांच्या गाड्यांचा ताफा सांगोला शहराकडे जात असताना पोलिसांच्या एक गाडीची आणि दुचाकीची धडक झाली. यामध्ये एकाच जागीच मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. तर, एकाची प्रकृती चिंताजनक असून जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे सांगण्यात आले. अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

प्रचारसभांत राज-उद्धव यांचे परस्परविरोधी व्हिडीओ? भाजपची मुंबई निवडणुकीसाठी रणनीती

Mumbai : मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगा ब्लॉकच प्रवाशांना टॅक्सी, रिक्षाचा आधार

कबुतरांना खाद्य घालणाऱ्या व्यावसायिकाला ५ हजारांचा दंड; माहीममध्ये घडली होती घटना

पुण्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का; शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

IAS अधिकाऱ्यांनी वेळेत मालमत्ता जाहीर करावी; केंद्र सरकारची तंबी