महाराष्ट्र

पवारांच्या नेतृत्वात बेळगावला जाणार? संजय राऊतांनी नेतृत्व बदललं का? शिंदे गटाच्या 'या' नेत्याने केला आरोप

प्रतिनिधी

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर शिंदे फडणवीस सरकारला षंढ म्हंटले. यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई हे टीका करताना म्हणाले की, "राऊत यांनी वापरलेल्या या शब्दाचा आम्ही तीव्र निषेध करतो. खुद्द संजय राऊत (Sanjay Raut) यांनाच बेळगाव कोर्टाचं समन्स होतं. तेव्हा न्यायालयाचं कवच असतानाही संजय राऊत तिथे का गेले नाहीत, मग षंढ कोण?" असा सवाल त्यांनी केला आहे. तर, "आता संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य नाही का?" असा प्रश्न देखील त्यांनी विचारला आहे.

खासदार संजय राऊत यांनी, 'बेळगाव सीमाप्रश्न मार्गी लागला नाही, तर शरद पवार यांच्या नेतृत्वात आम्ही सीमेवर आंदोलन करू' असे वक्तव्य केले होते. यावर शंभूराज देसाई टीका करताना म्हणले की, "संजय राऊतांना उद्धव ठाकरे यांच्यपेक्षा शरद पवारांचे नेतृत्व मोठे वाटत आहे. आम्ही हीच गोष्ट उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षांपूर्वी सांगण्याचा प्रयत्न करत होतो. राऊत हे राष्ट्रवादी पक्षाच्या आहारी गेले आहेत. उद्धव ठाकरेंची शिवसेना संजय राऊत राष्ट्रवादीच्या दावणीला बांधत आहेत. राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांनी आपले नेतृत्व बदलले आहे का? अशी शंका उपस्थित होते."

पुढे शंभूराज देसाई म्हणाले की, "षंढ हा शब्द संजय राऊत यांनी हा शब्द वापरला. राऊत स्वतः कोण आहेत? ज्यांना १५ दिवसांपूर्वी कर्नाटक सरकारच्या कोर्टाकडून समन्स दिले होते. ते सुद्धा पूर्ण करण्याचे धाडस त्यांच्यात नाही. न्यायालयाचे कवच असतानाही ते कर्नाटकात जायला घाबरले. ते केवढे मोठे षंढ आहेत. उगाच बाह्या वर करून मोठ्याने बोलायचं, ही त्यांची पद्धत कुणीही सहन करणार नाही. त्यांनी अशी वक्तव्ये करणे टाळावे नाहीतर, पुन्हा आराम करायची वेळ येऊ नये." असा इशारा त्यांनी दिला.

मतचाचण्यांचे निष्कर्षही संदिग्ध

एकतेचा मंत्र जपावाच लागेल!

दक्षिण-मध्य मुंबईत शेवाळेंविरुद्ध देसाई

म्हस्केंच्या उमेदवारीमुळे महायुतीत सुंदोपसुंदी; नवी मुंबईतील ६४ माजी नगरसेवकांचे राजीनामे

विशाल पवार यांच्या हत्येचा तपास सुरू; गर्दुल्ल्यांच्या हल्ल्यात झाला मृत्यू