महाराष्ट्र

शनिशिंगणापूर देवस्थानात आर्थिक गैरव्यवहार; दोषींवर फौजदारी गुन्ह्यांचे आदेश - मुख्यमंत्री

शनिशिंगणापूर देवस्थानात कर्मचारी, पुजारी व विश्वस्तांनी बनावट कर्मचारी दाखवत ऑनलाईन पद्धतीने ५०० कोटींहून अधिक पैसे लाटल्याचा मुद्दा सदस्य विठ्ठल लंघे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सभागृहात सांगितले.

Swapnil S

मुंबई : शनिशिंगणापूर देवस्थानात कर्मचारी, पुजारी व विश्वस्तांनी बनावट कर्मचारी दाखवत ऑनलाईन पद्धतीने ५०० कोटींहून अधिक पैसे लाटल्याचा मुद्दा सदस्य विठ्ठल लंघे यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी सभागृहात सांगितले.

दरम्यान, अहिल्या नगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार झाल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून आलेल्या अहवालात स्पष्ट झाले आहे.

देवस्थानमध्ये बनावट ॲप आणि पावत्यांद्वारे देणगी वसुल करून तसेच हजारो बनावट कर्मचाऱ्यांची नोंद करून गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाले आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार, संस्थानच्या विविध विभागांत २४४७ बनावट कर्मचारी दाखवण्यात आले. त्यांच्या नावाने पगाराचे पैसे काही अन्य व्यक्तींच्या खात्यांत वळते करण्यात आले. रुग्णालय विभागात ३२७ कर्मचारी दाखवले गेले, प्रत्यक्षात केवळ १३ कर्मचारी उपस्थित होते. अस्तित्वात नसलेल्या बागेच्या देखभालीसाठी ८० कर्मचारी, १०९ खोल्यांच्या भक्तनिवासासाठी २०० कर्मचारी, १३ वाहनांसाठी १७६ कर्मचारी, प्रसादालयात ९७ कर्मचारी दाखवण्यात आले होते. इतर विभागांमध्येही असेच बनावट कर्मचारी दाखवण्यात आले आहेत. बनावट अ‍ॅपच्या माध्यमातून लाखो रुपयांचा गैरव्यवहार झाला असून सायबर पोलिसांकडून याचा स्वतंत्र तपास सुरू आहे. जे ट्रस्टी लोकसेवकांच्या व्याख्येत येतात, त्यांच्या संपत्तीची चौकशी केली जाईल असेही फडणवीस म्हणाले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत