महाराष्ट्र

पक्ष फोडणाऱ्यांचा पराभव झालाच पाहिजे; शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी शनिवारी राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला.

Swapnil S

छत्रपती संभाजीनगर/लातूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) नेते शरद पवार यांनी शनिवारी राज्यातील मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार हल्ला चढविला. राष्ट्रवादीतील फुटीमागे जे आहेत त्यांचा पराभव झालाच पाहिजे, असे शरद पवार म्हणाले. जनतेला धमकावण्याचे सुरू असलेलेल प्रकार थांबलेच पाहिजेत, असेही ते म्हणाले.

बीड जिल्ह्यातील परळी येथे ते बोलत होते. धनंजय मुंडे यांना शक्य होते तेवढे आपण दिले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये फूट पाडण्यात काही लोकांनी महत्त्वाची भूमिका बजावली त्यामुळे त्यांचा पराभव झालाच पाहिजे. धनंजय मुंडे यांचे वडील पंडित मुंडे एकदा धनंजय यांच्यासमवेत आपल्याकडे आले आणि धनंजय यांच्यासाठी आपल्याकडे मदत मागितली. त्यानंतर आपण धनंजय यांना प्रथम

महायुती सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष

त्यापूर्वी लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील सभेत शरद पवार यांनी महायुती सरकारवर हल्ला चढविला. या सरकारला कृषी क्षेत्राची जाण नाही आणि सुशिक्षित बेरोजगारांबाबतची चिंता नाही, अशा सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहेत, असेही ते म्हणाले.

विधान परिषदेतील आमदार केले, त्यानंतर विरोधी पक्षनेते केले आणि त्यानंतर मंत्री केले. आपल्याला धनंजय यांचे बीड जिल्ह्यात नेतृत्व द्यावयाचे होते. मात्र आता येथील जनतेला त्रास दिला जात आहे आणि हे प्रकार थांबलेच पाहिजेत, असे शरद पवार म्हणाले.

आता सत्ताधाऱ्यांची बॅग तपासणी; टीकेनंतर निवडणूक अधिकारी सक्रिय

शरद पवार यांचे छायाचित्र, व्हिडीओ वापरू नका! सुप्रीम कोर्टाचे अजित पवार गटाला आदेश

कोकणचे अदानीकरण होऊ देणार नाही! उद्धव ठाकरे यांचा घणाघात; केसरकर, राणे पिता-पुत्रांवरही टीका

मातोश्री क्लबला टाळे ठोका; ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्य निवडणूक आयोगाला निवेदन

झारखंडमध्ये ४३ मतदारसंघांत आज पहिल्या टप्प्याचे मतदान; वायनाडमध्येही मतदानाला सुरूवात