महाराष्ट्र

शरद पवारांना रुग्णालयातून डिस्चार्ज

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार यांना शनिवारी पुण्यातील रुबी हॉल क्लीनिक येथून उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

Swapnil S

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) सर्वेसर्वा शरद पवार यांना शनिवारी पुण्यातील रुबी हॉल क्लीनिक येथून उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. काही दिवसांपूर्वी खोकल्याच्या त्रासामुळे त्यांना बारामतीहून पुण्यात दाखल करण्यात आले होते. आवश्यक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या प्रकृतीबाबत समाधान व्यक्त केले आहे.

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि चिंतेचे कोणतेही कारण नाही. पुढील काही दिवस घरी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून नियमित औषधोपचार सुरू ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. तपासण्या समाधानकारक आढळल्याने त्यांना मर्यादित प्रवासास परवानगी देण्यात आल्याचेही रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, आरोग्य सुधारल्यानंतर पवार लवकरच नियमित राजकीय व संघटनात्मक कामकाजात सक्रिय होतील, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. मात्र, पूर्णपणे ठणठणीत झाल्यानंतरच पुढील दौरे आणि बैठकींचे नियोजन केले जाईल, असे पक्ष सूत्रांनी सांगितले.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम