शरद पवारांची प्रकृती पुन्हा खालावली 
महाराष्ट्र

शरद पवारांची प्रकृती पुन्हा खालावली

राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लीनिकमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

Swapnil S

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे (शप) ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती पुन्हा एकदा बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना प्रचंड अशक्तपणा जाणवू लागल्यामुळे पुण्यातील रुबी हॉल क्लीनिकमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

शरद पवार यांच्या शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने त्यांना अशक्तपणा जाणवत आहे. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना सलाईन लावण्यात आली. सध्या त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टरांची एक विशेष टीम तैनात करण्यात आली आहे. रुग्णालय प्रशासनाने सांगितले की, शरद पवारांना सौम्य डिहायड्रेशनमुळे रुबी हॉल क्लीनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना द्रवपदार्थांची आवश्यकता आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून, ते २ दिवस रुबी हॉल क्लीनिकमध्ये राहतील आणि नंतर त्यांना घरी पाठवण्यात येईल.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

इंटरनेटशिवाय UPI पेमेंट? RBI च्या नव्या सुविधेने काय बदलणार? जाणून घ्या सविस्तर

महाबळेश्वर-पाचगणी परिसरात स्ट्रॉबेरी लागवडीची लगबग सुरू; मजूर टंचाई, वाढती रोजंदारी आणि उत्पादन खर्चामुळे शेतकरी चिंतातूर

SRA कडून ४५० हून अधिक निष्क्रिय विकासकांची हकालपट्टी

Ganeshotsav 2026 : मुंबईकरांना घरबसल्या मिळणार उकडीचे अन् तळलेले मोदक; BMC च्या महिला बचत गटांचा खास उपक्रम