महाराष्ट्र

हिंदी सक्तीचा हट्ट सोडा; शरद पवार यांचे प्रतिपादन

प्राथमिक शिक्षणात हिंदी नको, देशातील बहुतांशी वर्ग हिंदी बोलतो. पण, मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील याचा विचार व्हावा. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीचे नकोच. त्यामुळे फडणवीस सरकारनेही पाचवीपर्यंतचा हिंदीचा हट्ट सोडावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला.

Swapnil S

कराड : प्राथमिक शिक्षणात हिंदी नको, देशातील बहुतांशी वर्ग हिंदी बोलतो. पण, मुले विशिष्ट वयात हिंदी किती आत्मसात करतील याचा विचार व्हावा. त्यामुळे प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीचे नकोच. त्यामुळे फडणवीस सरकारनेही पाचवीपर्यंतचा हिंदीचा हट्ट सोडावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिला. सातारा येथे रयत शिक्षण संस्थेचा एआय सेंटर ऑफ एक्सलन्स या शैक्षणिक उपक्रमाचा शुभारंभ सोहळा गुरुवारी पार पडला. या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रमुख उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे, माजी आमदार प्रभाकर घार्गे, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.

शरद पवार हे गुरुवारी रयत शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या बैठकीसाठी सातारा दौऱ्यावर आले होते. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार म्हणाले की, हिंदी विरोधापेक्षा प्रथम मी एआय (कृत्रिम बुध्दीमत्ता) पाहतो. कारण, एआयचे फायदे आहेत. सामान्य कुटुंबातील मुलांनाही एआयचे शिक्षण मिळावे याची काळजी घेतली पाहिजे. एआयच्या वापराने शेती, उद्योग, शिक्षणातही फायदे आहेत. त्यामुळे केंद्र शासनानेही एआयला

मान्यता दिली आहे. राज्य शासनानेही ५०० कोटींची तरतूद केली आहे. शेतीचे उत्पादन वाढवायचे असेल तर एआयचा वापर व्हायलाच हवा. यामुळे शेतकऱ्यांवरील ओझेही कमी होईल. तसेच रयत शिक्षण संस्थेनेही एआय वापरासाठी पुढाकार घेतला आहे. याचाही उपयोग होणारच आहे. हिंदी भाषा सक्तीच्या प्रश्नावर व राज्यातील शिक्षणात हिंदीला होत असलेला विरोध यावर बोलताना पवार यांनी प्राथमिक शिक्षणात हिंदी नको, असा सल्ला शासनाला दिला.

शाळांत हिंदी सक्तीवरून गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

आणीबाणी उकरून काढणे शहाणपणाचे लक्षण नाही...

देशात आणीबाणी लादल्याबद्दल भाजपने देशात आवाज उठवल्याचा प्रश्नही पत्रकारांनी उपस्थित केला असता पवार म्हणाले की, आणीबाणीनंतर पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशाची जाहीर माफी मागितली होती. पुन्हा आणीबाणी उकरून काढणे शहाणपणाचे लक्षण नाही. आणीबाणीला विरोध केलेल्यांच्या हातातच आता देशाची सत्ता असून ही वस्तूस्थिती आहे, अशी आठवणही शरद पवार यांनी भाजपला करून दिली.

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video