महाराष्ट्र

Video : कार्यकर्त्याची घोषणा अन् शरद पवार म्हणाले, "हे कोंढाजी वाघ आहेत ना?", पवारांच्या स्मरणशक्तीचा पुन्हा प्रत्यय

Rakesh Mali

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे त्यांच्या दांडग्या जनसंपर्कामुळे सर्वत्र ओळखले जातात. पवार यांनी जवळपास सर्वच क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. असे म्हणतात की, असे एकही क्षेत्र नाही ज्याविषयी पवारांना माहिती नाही. तसेच, कार्यकर्त्यांना जोडण्यात देखील पवारांचा हातखंडा आहे. 84 वर्ष वयातही त्यांची स्मरणशक्ती वाखाण्याजोगी आहे. आज महाराष्ट्राला पुन्हा याचा प्रत्यय आला आहे.

आज शरद पवार यांच्या हस्ते पुण्यातील जुन्नर-आंबेगावमधील विघ्नहर सहकारी साखर कारखान्यातील आसवणी आणि इथेनॉल प्रकल्पाच्या विस्तारणीकरणाचा उद्घाटन समारंभ संपन्न झाला. यावेळी भाषण सुरू करण्यापूर्वी घडलेला एक प्रसंग पाहून उपस्थितांनी पवारांच्या स्मरणशक्तीला सलाम ठोकला.

पवार भाषणासाठी उभे राहिले. त्यावेळी मोठमोठ्याने घोषणाबाजी सुरु झाली. यावेळी एक कार्यकर्ता मोठ-मोठ्याने घोषणा देत होता. पवार यांनी एका क्षणात त्या कार्यकर्त्याचा आवाज ओळखत त्याच्या नावाचा उल्लेख केला. यावेळी उपस्थितांनी शिट्ट्या वाजवत टाळ्यांचा कडकडाट केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत शरद पवार यांच्या लोकसंग्रहाला आणि स्मरणशक्तीला सलाम केला आहे.

नेमके काय घडले?

शरद पवार भाषणाला सुरुवात करणार एवढ्यात एका कार्यकर्त्याने ‘पवार साहेबांचा विजय असो…’, ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो…’ अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. यावेळी ज्या दिशेने त्या कार्यकर्त्याचा आवाज आला तिकडे बोट दाखवत पवार म्हणाले, हे कोंढाजी वाघ आहेत ना? त्यावर उपस्थितांनी होकारार्थी उत्तर दिले. या वयातही त्यांची स्मरणशक्ती पाहून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस