महाराष्ट्र

"त्या घरातील भगिनींनी जे धाडस दाखवलं, ते त्या नेत्याला दाखवला आलं नाही", कोल्हापूरातील सभेत शरद पवारांनी हसन मुश्रीफांना फटकारलं

नवशक्ती Web Desk

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार(Sharad Pawar)यांनी पक्षात झालेल्या बंडखोरीनंतर पक्षाची नव्याने बांधणी करण्याचं काम हाती धरलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज शरद पवार यांच्या सभेचं कोल्हापूरात आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी मंत्री हसन मृश्रीफ(Hasan Mushrif) यांच्यावर टीकेची झोळ उठवली. सत्तेचा वापर हा विरोधकांना नामोहराम करण्यासाठी सुरु आहे. कोल्हापूरच्या एका नेत्याच्या घरी ईडी,(ED) आयकरने धाडी टाकल्या. त्या घरातील भगिनींनी आम्हाला हवं तर गोळ्या घाला पण असा छळ नको असं बोलण्याचं धाडस दाखवलं. मात्र, त्या घरच्या नेत्यांना हे धाडस दाखवता आलं नाही. ते भाजपच्या बाजूला जाऊन बसले, अशा शब्दात शरद पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला.

आज (25 ऑगस्ट) कोल्हापूरातील दसरा चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने स्वाभिमान सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शरद पवार यांनी भाजपसह अजित पवार गटात गेलेले मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर चांगलीच टीकेची झोळ उठवली. सत्तेचा गैरवापर कुणी केला? तरुणांना बिघडवलं कुणी? हे सगळं आपण बदलू. मोदींच्या हातातून सत्ता काढून घेऊन तरुणांच्या हाती देण्याची गरज आहे. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवण्याची संधी असल्याचंही पवार यावेळी म्हणाले.

देशमुख राऊत यांच कौतूक तर मुश्रीफांना फटकारलं

राष्ट्रावादी काँग्रेसमधील काही आमदारांना सोबत घेत अजित पवारांनी(Ajit Pawar) बंड केले. यानंतर शरद पवारांची कोल्हापूरात पहिलीच सभा होती. या सभेत शरद पवारांनी बंडखोर नेत्यांना चांगलचं फटकारलं. यावेळी पवार म्हणाले की, अनिल देशमुख(Anil Deshmukh) स्वच्छ भूमिका घेत होते. त्यांनी तडजोड करणार नसल्याची भूमिका घेतली. पण केवळ त्रास देण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्याला तुरुंगात टाकलं. सामनाचे संपादक संजय राऊत(Sanjay Raut) भाजपवर टीका करत असतात त्यांनाही लिखाण बंद करण्याची धमकी दिली. ते जुमानले नाहीत तर त्यांना देखील तुरुंगात टाकलं. नवाब मलिक(Nawab Malik) यांना देखील तुरुंगात टाकलं. भाजपला वाटलं आम्ही या सगळ्याला घाबरलो. मला ईडीची नोटीस आली होती. मी म्हटलं उद्या नाही तर आता येतो. सगळे पोलीस घरात येऊन बसले आणि येऊ नका म्हणाले. प्रत्येकानं असं केलं पाहीजे. आपण काही केलं नाही तर घाबरुन जाऊ नये. असं पवार म्हणाले.

यावेळी अजित पवार गटात सामील झालेले राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका करताना पवार म्हणाले की, कोल्हापूर ही शुरांची भूमी आहे. काही दिवसांपूर्वी काहींना ईडीची नोटीस आली. पण मला वाटलं ते ईडीला सामोरं जातील. घरातील भगिनींनी सांगितलं की आम्हाला गोळ्या घाला. पण कुटुंब प्रमुखाने तसं म्हटलेलं ऐकलं नाही. जी भूमिका त्या घरातील भगिनीने घेतली ती त्या प्रमुख नेत्याने घेतली नाही. ते भाजपसोबत सत्तेच जाऊन बसले, असं शरद पवार म्हणाले.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त