ठाकरे देतील त्या उमेदवाराला पाठिंबा; शरद पवारांची भूमिका 
महाराष्ट्र

ठाकरे देतील त्या उमेदवाराला पाठिंबा; शरद पवारांची भूमिका

राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमिताने महाविकास आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यातील आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या निमिताने महाविकास आघाडीमध्ये मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना खंबीर पाठिंबा दिला होता. आता या पाठिंब्याची शरद पवार 'परतफेड' करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

'विधानपरिषदेसाठी उद्धव ठाकरे जे नाव देतील, त्याला आमच्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल,' असा शब्द शरद पवार यांनी दिला आहे. या निर्णयामुळे विधानपरिषदेची महाविकास आघाडीची एकमेव जागा आता 'ठाकरे गटा' च्या वाट्याला जाणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक पार पडणार आहे. विधानसभेतील संख्याबळानुसार महायुतीच्या वाट्याला ८ तर महाविकास आघाडीला केवळ १ जागा मिळण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांच्या विधानामुळे ही एकमेव जागा आता 'ठाकरे गटा'च्या पदरात पडण्याची दाट शक्यता आहे. पुढील महिन्यात खुद्द उद्धव ठाकरे यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत संपत असल्याने, ते स्वतः मैदानात उतरणार की एखाद्या निष्ठावान सहकाऱ्याला संधी देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

१० एप्रिलपासून टोलवर कॅश बंद! FASTag-यूपीआय अनिवार्य; काय आहेत नवे नियम? जाणून घ्या

Mumbai : चर्चगेट मेट्रो स्थानकाचे A4 गेट तात्पुरते बंद; कधी होणार सुरू? जाणून घ्या वेळ

Thane : अंधश्रद्धेचा गैरफायदा! 'काळ्या जादूचा प्रभाव दूर करतो' म्हणत कुटुंबाला १.६६ कोटींचा गंडा

ठाणे महापालिकेचा महसूल १,९०९ कोटींवर; करवसुलीत आघाडी कायम

ठाण्यात घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी; १७ एप्रिलपासून MCHIचे प्रॉपर्टी प्रदर्शन