महाराष्ट्र

शिर्डीत गुरुपौर्णिमेला साईबाबांना ६ कोटींचे दान

शिर्डीत साईबाबांचा मोठा उत्सव साजरा होतो. या उत्सवाला राज्यासह देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. या भाविकांना यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवात साईंच्या चरणी मोठ्या प्रमाणात गुरुदक्षिणा जमा झाली आहे.

Swapnil S

शिर्डी : शिर्डीत साईबाबांचा मोठा उत्सव साजरा होतो. या उत्सवाला राज्यासह देशाच्या विविध भागातून मोठ्या संख्येने भाविक साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. या भाविकांना यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवात साईंच्या चरणी मोठ्या प्रमाणात गुरुदक्षिणा जमा झाली आहे. गेल्या तीन दिवसात मंदिर समितीकडे ६ कोटी ३१ लाखांहून अधिक दान आले आहे. गुरुपौर्णिमा उत्सवाच्या कालावधीत गेल्या तीन दिवसात साईंच्या चरणी भाविकांनी, भक्तांनी भरभरून दान दिले आहे. . दक्षिणा पेटी, देणगी काऊंटर, सशुल्क पास, डेबिट-क्रेटीट कार्ड, ऑनलाईन देणगी, मनी ऑर्डरच्या माध्यमातून हे दान साई चरणी जमा करण्यात आलं आहे. येथील देणगी काऊंटरवर १ कोटी १७ लाख ८४ हजार रुपये, तर सशुल्‍क पास देणगीतून ५५ लाख ८८ हजार २०० रुपये मिळाले.

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

संजय राऊत मानहानी प्रकरण : नारायण राणेंना धक्का; समन्स रद्द करण्याचा अर्ज फेटाळला

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

NATO ची भारत, चीन, ब्राझीलला धमकी; रशियाशी व्यापार थांबवा, अन्यथा १०० टक्के टॅरिफ

फडणवीस-शिंदे-ठाकरेंमध्ये रंगली जुगलबंदी; आमच्यासोबत सत्तेत या! मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंना सभागृहातच थेट ऑफर