महाराष्ट्र

काँग्रेसचा महिलाविरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर शितल म्हात्रे यांची टीका

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने महिलांना आधार मिळाला आहे. परंतु काँग्रेसची भूमिका नेहमीच महिला विरोधी असून काँग्रेसचे नेते सुनील केदार म्हणतात आमची सत्ता आली, तर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करणार.

Swapnil S

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने महिलांना आधार मिळाला आहे. परंतु काँग्रेसची भूमिका नेहमीच महिला विरोधी असून काँग्रेसचे नेते सुनील केदार म्हणतात आमची सत्ता आली, तर मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना बंद करणार. यावरून काँग्रेसचा महिला विरोधी चेहरा पुन्हा एकदा समोर आला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या बहिणींच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहेत, असे शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे म्हणाल्या.

आरक्षण संपवणार असे वक्तव्य काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात केले होते. त्यामुळे काँग्रेस नेहमीच महिला विरोधी आहे हे दिसून आले. आता सुनील केदार यांच्या रूपाने काँग्रेसचा महिला धोरण विरोधी खरा चेहरा समोर आला आहे, असे म्हात्रे म्हणाल्या.

पुढे शितल म्हात्रे म्हणाल्या की, बँक घोटाळ्यातील आरोपी काँग्रेस नेते सुनील केदार यांनी सत्तेत आल्यास मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू, असे तारे तोडले आहेत. एकूणच बहुजनांना आणि महिलांना लाभ मिळू नयेत हेच काँग्रेसचे धोरण आहे. काँग्रेसच्या भुलथापांना भगिनींनी घाबरून जावू नये, असे त्या म्हणाल्या.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी