महाराष्ट्र

ठाकरे-शिंदे शिवसेनेचे आज दसरा मेळावे

शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे गट) यांचे दसरा मेळावे उद्या आयोजित केले आहेत. शिवतीर्थावर शिवसेनेचा (उबाठा) मेळावा होणार आहे. तर शिंदे सेनेचा मेळावा नेस्को, गोरेगाव येथे आयोजित केला आहे. मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेचे नेते काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Swapnil S

मुंबई : शिवसेना (उबाठा) व शिवसेना (शिंदे गट) यांचे दसरा मेळावे उद्या आयोजित केले आहेत. शिवतीर्थावर शिवसेनेचा (उबाठा) मेळावा होणार आहे. तर शिंदे सेनेचा मेळावा नेस्को, गोरेगाव येथे आयोजित केला आहे. मनपा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेनेचे नेते काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेनेचा (उबाठा) दसरा मेळावा उद्या दादर येथील शिवतीर्थावर होत आहे. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आवाज घुमणार असून ते शिवसैनिकांना कोणता विचार देतात आणि अतिवृष्टीसह विविध प्रश्नांवरून राज्यकर्त्यांवर कसा आसुड ओढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना फुटीनंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा आमने-सामने उभे ठाकले आहेत. २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत दोन गट पडले आणि मुंबईत दोन वेगवेगळे दसरा मेळावे होऊ लागले. मुंबईत सुरू असलेल्या पावसामुळे शिवाजी पार्क आणि आझाद मैदानात चिखल झाला असून, पाणी साचल्याने शिंदे गटाने आझाद मैदानातून तयारी हलवून नेस्को सेंटरची निवड केली आहे. ठाकरे गटानेही पावसाचा धोका लक्षात घेऊन वरळी डोमची चाचपणी सुरू ठेवली आहे.

मुंबईत 'कॅच द कल्प्रीट ऑन कॅमेरा' मोहीम सुरू; नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे फोटो पाठवण्याचे आवाहन

Mumbai : हुंडाबळी, आत्महत्या घटल्या; मात्र, छळाच्या घटनांमध्ये झाली वाढ

प्रवाशांचे सामान, दागिने चोरीचे प्रमाण वाढले; मुंबई विमानतळावरील पोलिसांचे तपासाचे आव्हान कायम

भाजपच्या सर्वच नगरसेवकांची कानउघाडणी; सभागृहातील गदारोळ, सत्ताधारी-विरोधक संघर्ष

राहुल गांधींची कॉपी करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न फसला! सपकाळ यांची टीका