ANI
महाराष्ट्र

शिंदे गटाचा विधानसभेच्या १०० जागांवर दावा, शिवसेना मंत्री दिपक केसरकरांचं वक्तव्य

Suraj Sakunde

लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर महायुतीनं आपलं लक्ष आगामी विधानसभा निवडणुकीवर केंद्रित केलं आहे. येत्या दीड महिन्यांमध्ये निवडणूक आचारसंहिता लागू होऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये महायुतीमध्ये जागावाटपावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे गट १०० जागा लढवेल, असा दावा शिवसेना आमदार आणि राज्याचे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी केला आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटानं ६० जागा लढवाव्या, असंही ते म्हणाले.

नेमकं काय म्हणाले केसरकर?

दिपक केसरकर म्हणाले की, "१०० जागांची जरी मागणी असली, तरी भाजपमध्येही बोललं जातंय की ९०-९५च्या आसपास जागा आम्ही लढवाव्यात. साधारण ६० च्या आसपास जागा अजित पवार गटाने लढवाव्या. पण १०० जागांच्या शिंदेसाहेब ठाम आहेत. परंतु ज्यावेळी त्यांचं बोलणं वरिष्ठांशी होईल, त्यावेळी ते कमी जास्त करतील. परंतु तयारी तर करावी लागेल. आम्ही काय २८८ जागांवर तयारी करत नाही. १०० जागांवरच तयारी करत आहोत. भाजपसुद्धा आपल्या ठराविक सीट्सवरच तयारी करतंय. त्यामुळं महायुती घट्ट आहे."

भाजप १५०-१६० जागा लढवणार?

आज पुण्यामध्ये अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपची बैठक पार पडत आहे. या बैठकीला भाजपचे राज्यातील सर्व महत्त्वाचे उपस्थितीत राहणार असून महायुतीत भाजप नेमक्या किती जागा लढवणार, हे स्पष्ट होऊ शकते. दरम्यान या बैठकीत भाजप १५०-१६० जागा लढवण्याची घोषणा करू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

मविआचा तिढा सुटला! २६० जागांवर सहमती; २८ जागांवर रस्सीखेच; १-२ दिवसांत जागावाटप जाहीर होणार

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन