महाराष्ट्र

धुळ्यातील धक्कादायक घटना, एकाच कुटुंबातील चौघांनी संपवले आयुष्य

धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आई, वडील आणि दोन मुलांनी आत्महत्या केली असून, या भयंकर घटनेने जिल्हा हादरून गेला आहे

Swapnil S

धुळे : धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. आई, वडील आणि दोन मुलांनी आत्महत्या केली असून, या भयंकर घटनेने जिल्हा हादरून गेला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे.

प्रवीण मानसिंग गिरासे (५३), गीता प्रवीण गिरासे (४७) तसेच मुले मितेश प्रवीण गिरासे (१८) आणि सोहम प्रवीण गिरासे (१५) अशी मृतांची नावे आहेत. धुळे शहरातील समर्थ कॉलनी परिसरात गिरासे कुटुंब राहत होते. मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी मुंबईला जात असल्याचे त्यांनी शेजाऱ्यांना सांगितले होते. मात्र त्यांनी अचानक आत्महत्या केल्याचे आढळून आले. यापैकी प्रवीण गिरासे यांनी गळफास घेऊन, तर कुटुंबातील इतर तिघांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. मृतदेहांजवळ कोणतीही सुसाइड नोट पोलिसांना सापडली नाही. मंगळवारपासून त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. आत्महत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

प्रवीण गिरासे यांचे लामकानी गावात एक खताचे दुकान असून पत्नी गीता शिक्षिका आहे, तर मुलांचे शिक्षण सुरू होते. त्यांनी आपल्या शेजाऱ्यांना आपण मुलाच्या अ‍ॅडमिशनसाठी मुंबईला जाण्याचे कारण सांगितले होते. त्यानंतर मंगळवारपासूनच त्यांच्या घराचा दरवाजा बंद होता. त्यांचे कुटुंबीय गुरुवारी त्यांना येथे भेटण्यासाठी आले असता, ही घटना उजेडात आली. त्यांनी तातडीने ही घटना पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता