महाराष्ट्र

शेणोली गावात शॉर्टसर्किट; १५ जण थोडक्यात बचावले

शॉर्टसर्किटमुळे ११००० वोल्टच्या मुख्य विद्युत वाहक तारांनी अचानक पेट घेतल्याने भीषण आग लागून यामध्ये या तारांखाली असलेल्या घरावरील विद्युत साहित्य जळून खाक झाल्याची घटना कराड तालुक्यातील शेणोली येथे रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली.

Swapnil S

कराड : शॉर्टसर्किटमुळे ११००० वोल्टच्या मुख्य विद्युत वाहक तारांनी अचानक पेट घेतल्याने भीषण आग लागून यामध्ये या तारांखाली असलेल्या घरावरील विद्युत साहित्य जळून खाक झाल्याची घटना कराड तालुक्यातील शेणोली येथे रविवारी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. यामध्ये घरात झोपलेल्या १५ जणांचा जीव थोडक्यात वाचला आहे.

शेणोली गावात शहानवाज मुल्ला हे आपल्या कुटुंबासह राहतात. रविवारी रात्री मुल्ला कुटुंब घरात झोपले होते. यावेळी मध्यरात्री १ वाजवाजण्याच्या सुमारास लहान मुले, जेष्ठ नागरिक आणि कुटुंबातील सदस्य गाढ झोपेत असतानाच घरावरून जाणाऱ्या सदर तारांनी शॉर्टसर्किट होऊन पेट घेतला.त्याच्या ठिणग्यांमुळे घराला अचानक आग लागल्याने एकच गोंधळ उडाला. घराशेजारील नागरिकांनी प्रसंगावधान राखत घरातील मुल्ला यांच्या कुटुंबियांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर सदरची माहिती वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांना दिली.माहिती मिळताच वीज कर्मचारी विशाल विजय गायकवाड व समीर मुल्ला व इतर कर्मचारी, ग्रामस्थ यांनी धाडसाने मुख्य लाईट बंद केली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला.

गणपती गेले गावाला...! 'पुढच्या वर्षी लवकर या'चा घुमला जयघोष; दहा दिवसांच्या गणेश मूर्तीचे उत्साहात विसर्जन

मोदी व्हर्चुअल 'ब्रिक्स' शिखर परिषदेला अनुपस्थित राहणार

भारतासोबतचे संबंध पुन्हा स्थापित करण्यास तयार! ट्रम्प यांना आली उपरती; मोदींकडून ट्रम्प यांच्या विचारांचे कौतुक

मुंबईत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा गजाआड; गोंधळ माजवण्यासाठी पाठवला संदेश

आजचे राशिभविष्य, ७ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत