Sindhudurg : वैभव नाईक यांच्या मागे एसीबीचा ससेमिरा 
महाराष्ट्र

Sindhudurg : वैभव नाईक यांच्या मागे एसीबीचा ससेमिरा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्ता आणि व्यावसायिक व्यवहारांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) सुरू असलेली चौकशी पुन्हा चर्चेत आली आहे.

Swapnil S

सिंधुदुर्ग : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार वैभव नाईक यांच्या मालमत्ता आणि व्यावसायिक व्यवहारांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (एसीबी) सुरू असलेली चौकशी पुन्हा चर्चेत आली आहे. एसीबीने यासंदर्भात आणखी काही माहिती मागविल्याने नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वैभव नाईक यांच्या मालमत्ता व व्यावसायिक व्यवहारांबाबत गेल्या दोन वर्षांपासून चौकशी सुरू आहे. या चौकशीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे रत्नागिरी विभागाचे उपअधीक्षक अविनाश पाटील यांनी कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र पाठवून शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील इमारत क्रमांक ७ मधील गाळा आणि सिटी सर्व्हे क्रमांक ४३२१ ही मिळकत एकच आहे की स्वतंत्र, याबाबतची माहिती मागविली आहे. नाईक यांनी चौकशीदरम्यान दिलेली माहिती, कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचा प्राथमिक उल्लेख करत एसीबीने ही माहिती नगरपंचायतीकडे मागविल्याचे समजते.

राजकीय वातावरण बदलले किंवा अधिकारी बदलले की माझ्याविरोधात पुन्हा नव्याने चौकशीचे चक्र सुरू केले जाते. हा माझ्यावर होत असलेला शुद्ध अन्याय आहे.रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून सन २०२२ पासून त्यांची चौकशी सुरू आहे. या संपूर्ण प्रक्रियेत मी नेहमीच चौकशी यंत्रणेला सहकार्य केले आहे. कायदा आणि व्यवस्थेचा सन्मान राखत आजही चौकशीला माझा कोणताही विरोध नाही. यापुढेही मी पूर्ण सहकार्य करणार आहे.
वैभव नाईक, आमदार

मान्सूनची गती धीमी, तूर्तास हलक्या सरी; १५ जूनपर्यंत पेरणी नको - सरकारचे आवाहन

घरगुती गॅस दरवाढ; विरोधकांचा हल्लाबोल, मोदी सरकारला किंमत मोजावी लागेल - शरद पवार

राजीनामा होत नाही तोवर आंदोलन; धर्मेंद्र प्रधानांच्या गच्छन्तीबाबत ‘कॉकरोच’ ठाम, राजकीय पक्षांशी संबंध नाही - अभिजीत दीपके

पुण्यात रेव्ह पार्टीवर छापा; १०० जण ताब्यात

Mumbai : ८३५ बांधकामांना 'स्टॉप वर्क' नोटीस