SIR विरोधातील आंदोलनाने पुण्यात तणाव; ८८ आंदोलक पोलिसांच्या ताब्यात X| @gauraavkadam
महाराष्ट्र

SIR विरोधातील आंदोलनाने पुण्यात तणाव; ८८ आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेला आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी पुण्यात शनिवारी आंदोलन करण्यात आले. लाल महाल चौक आणि शनिवारवाडा परिसरात जमलेल्या सीजेपीच्या ८८ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

Swapnil S

पुणे : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या (एसआयआर) प्रक्रियेला आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेला विरोध करण्यासाठी पुण्यात शनिवारी आंदोलन करण्यात आले. लाल महाल चौक आणि शनिवारवाडा परिसरात जमलेल्या सीजेपीच्या ८८ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना लष्कर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तेथे विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले, तर पोलीस ठाण्याबाहेर समर्थकांनी घोषणाबाजी करत निषेध नोंदवला.

पोलिसांच्या माहितीनुसार, एसआयआर प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली काढण्यासाठी काही संघटनांनी परवानगी मागितली होती. मात्र, कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही शनिवारी दुपारी काही आंदोलक शनिवारवाडा परिसरात रस्त्यावर जमले. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याचे सांगत पोलिसांनी ८८ आंदोलकांना ताब्यात घेतले.

या कारवाईची माहिती मिळताच आंदोलकांचे समर्थक पोलीस ठाण्याबाहेर जमा झाले. दरम्यान, ताब्यात घेतलेल्या काही युवकांचे पालकही पोलीस ठाण्यात दाखल झाले. संबंधित युवकांना पालकांच्या स्वाधीन करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मोठी बातमी! कोर्टाकडून CJP ला दिलासा; यूट्यूबर ध्रुव राठीसह प्रमुख नेत्यांची सुटका, आज पुन्हा जंतर-मंतरवर मोर्चा

IND vs WI, 2nd T20I : गोलंदाजांची आज पुन्हा कसोटी; वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेत आघाडी घेण्याचे भारतापुढे आव्हान

Mumbai : सहा धरणांच्या सुरक्षेचे ऑडिट; तज्ज्ञ समिती दोन महिन्यांत अहवाल सादर करणार, पालिका ४५ लाख ९० हजार रुपये खर्च करणार

Mumbai : पालिकेचा 'हॅलो ए वॉर्ड' उपक्रम; व्हॉट्सअ‍ॅपवर एआय-संचलित तक्रार निवारण सेवा सुरू

'वारी'वरील माहितीपटाचा जागतिक स्तरावर सन्मान