हर्षवर्धन सपकाळ 
महाराष्ट्र

...म्हणून फडणवीस ‘छावा’ करमुक्त करत नाहीत! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

‘छावा’ चित्रपट कादंबरीवर आधारित आहे. त्याला सगळे संदर्भ आहेत. या कादंबरीवर हा चित्रपट असेल तर त्यावर कुठलाही आक्षेप नोंदवण्याची गरज नाही.

Swapnil S

मुंबई : ‘छावा’ चित्रपट कादंबरीवर आधारित आहे. त्याला सगळे संदर्भ आहेत. या कादंबरीवर हा चित्रपट असेल तर त्यावर कुठलाही आक्षेप नोंदवण्याची गरज नाही. मात्र सावरकर, गोळवलकर यांनी संभाजीराजेंची बदनामी केली. त्यामुळेच देवेंद्र फडणवीस हा चित्रपट करमुक्त करत नाहीत, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

“मी काँग्रेसतर्फे हा चित्रपट करमुक्त करण्याची विनंती शासनाला केली होती. पण त्यावर काही झाले नाही. मात्र सावरकर, गोळवलकर गुरुजी आणि चिटणीस यांची बखर यात मोठ्या प्रमाणावर संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आली आहे. या बदनामीचे समर्थन म्हणून देवेंद्र फडणवीस हा चित्रपट करमुक्त करत नाही, असा आरोप त्यांनी केला.

हर्षवर्धन सपकाळ यांनी मुंबईत पक्ष कार्यालयात येत्या सोमवारी आणि मंगळवारी दिग्गज नेत्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. राज्यातील सर्व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची बैठक सोमवारी आणि मंगळवारी दुपारी १.३० वाजता होईल. या बैठकांमध्ये संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे.

पुढील कार्यक्रमांच्या नियोजनासंदर्भात प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ जिल्हाध्यक्ष पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. या बैठकीला विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार प्रणिती शिंदे, कुणाल पाटील, मुझफ्फर हुसेन यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार आहेत.

रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडणार नाहीत!

रवींद्र धंगेकर हे काँग्रेसचे नेते आहेत. ते वैयक्तिक कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटले. त्यांनी स्टेटसवर भगवा ठेवला तर गैर काय? माझे त्यांच्याशी बोलणे झाले, ते काँग्रेस सोडून कुठे जाणार नाहीत, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले. बेळगावसह इतर गावांसंदर्भात महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये जुना वाद आहे. यावर तोडगा निघाला पाहिजे. महाराष्ट्र एकीकरण समितीची आणि काँग्रेसची भूमिका एकच आहे, असेही ते म्हणाले.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत