ANI
महाराष्ट्र

म्हणून मी एकनाथ शिंदे यांना भेटायला आलो - बाबा रामदेव

बाबा रामदेव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले

प्रतिनिधी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आमची आत्मियता होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सनातन धर्माचे गौरव पुरूष आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे आम्ही बाळासाहेबांचे अध्यात्मिक आणि राष्ट्रीय उत्तराधिकारी म्हणून पाहत असल्याचे मत योगगुरू बाबा रामदेव यांनी व्यक्त केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्व बेगडी आहे असे वक्तव्य त्यांनी आज केले. या पार्श्वभूमीवर योगगुरू बाबा रामदेव यांनी देखील एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला समर्थन दिल्याने महत्व आले आहे.

बाबा रामदेव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या नंदनवन या निवासस्थानी भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. बाबा रामदेव यांनी देखील एकनाथ शिंदे यांना पाहून मेरे भाई अशी हाक मारली. भेटीनंतर बाबा रामदेव म्हणाले, एकनाथ शिंदे हे हिंदु धर्माचे,सनातन धर्माचे आहेत. राजधर्मासोबतच सनातन धर्मालाही ते निभावत आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी आलो आहे. बाबा रामदेव यांचा देशातील मोठया जनमानसावर प्रभाव आहे. योग तसेच पतंजली उदयोग समुहाच्या माध्यमातून बाबा रामदेव हे नाव घराघरात पोहोचले आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक