चंद्रकांत पाटील  संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

तर मुख्यमंत्री मुंडेंना राजीनामा देण्यास सांगतील; मंत्री चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दीड महिना होऊन गेला आहे.

Swapnil S

सांगली : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला जवळपास दीड महिना होऊन गेला आहे. मात्र तरीही अद्याप या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. “मस्साजोग प्रकरणात चौकशी सुरू आहे. राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यास समर्थ आहेत. त्यांना जर वाटले की, या प्रकरणात काही तथ्य आहे. तर ते ताबडतोब धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगतील., असे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आले होते. यावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. धनंजय मुंडे यांना वेगळा न्याय का? असा प्रश्न त्यांना विचारला गेला.

पोलीस यंत्रणा हत्या प्रकरणाची चौकशी करत अलून एसआयटीही नेमण्यात आली आहे. निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमण्यात आली आहे. वाल्मिक कराडसह इतर आरोपींना मकोका लावण्यापर्यंत तसेच वाल्मिक कराड याची संपत्ती जप्त करण्यापर्यंतची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे, असेही पाटील म्हणाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

दुष्काळामुळे जत तालुक्यात पिण्याचे आणि शेतीचे पाणी पुरेसे मिळत नव्हते. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी तेथील नागरिक कर्नाटकामध्ये जाण्यास इच्छुक होते. परंतु आता टेंभू योजनेतून जत तालुक्यातील प्रत्येक कानाकोपऱ्यात तलावत पाणी पोहोचण्याचे काम जवळजवळ ६० टक्के पूर्ण झाले आहे.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video