सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात नियोजित वधू-वराचा जागीच मृत्यू 
महाराष्ट्र

सोलापूर-धुळे महामार्गावर अपघातात नियोजित वधू-वराचा जागीच मृत्यू

साखरपुड्यानंतर आपल्या शैक्षणिक कामासाठी एके ठिकाणी जाणाऱ्या नियोजित वधू - वराचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर घडली. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Swapnil S

सोलापूर : साखरपुड्यानंतर आपल्या शैक्षणिक कामासाठी एके ठिकाणी जाणाऱ्या नियोजित वधू - वराचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावर घडली. या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वाशी तालुक्यातील पारा येथील नामदेव शिनगारे यांचा मुलगा अक्षय शिनगारे (२५) व इजोरा (हालमुक्काम वाशी) येथील सुनील चव्हाण यांची मुलगी अक्षया चव्हाण (२३) यांचा गेल्या रविवारी (१५ फेब्रुवारी) साखरपुडा झाला होता. त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांत त्यांच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू होती.

नववधू अक्षया हिची रविवारी लातूर येथे महापारेषनची परीक्षा होती. या परीक्षेसाठी अक्षय व अक्षया हे कारने पहाटे वाशी येथून लातूरच्या दिशेने निघाले होते. सकाळी ६ च्या सुमारास रत्नापूर पाटीजवळ चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व कार भरधाव वेगात थेट येडशी टोलवेच्या कमानीला धडकली. ही धडक एवढी भीषण होती की, कारचा पुढील भागाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. त्यात अक्षय व अक्षया या दोन्ही नियोजित वधू वराचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक अक्षय सिरसाट (२२) हा गंभीर जखमी झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच रत्नापूर येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी चालकाला १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी लगतच्या रुग्णालयात दाखल केले.

मोठी बातमी! ध्रुव राठीला दिल्ली पोलिसांनी घेतले ताब्यात

दिल्लीची नाकेबंदी, झुरळे आक्रमक; रेल्वे रद्द, मेट्रो, इंटरनेट सेवा बंद, ड्राय-डे जाहीर; परवानगी नाकारली तरी CJP आंदोलनावर ठाम

MPSC Protest Pune : प्रकृती बिघडली, तिघांचे उपोषण मागे

विप निवडणुकीत बंडोबांचे आव्हान; नागपूरच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये दुफळी, शिवसेना शिंदे गटाच्या मंगेश चिवटेंची माघार

जेन-झीला घाबरून सरकारची आणीबाणी; संपूर्ण देशच बंद करून टाका; CJP चा केंद्रावर हल्ला