महाराष्ट्र

विदर्भात अवकाळी पाऊस, गारपीट

परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच सर्वत्र उकाडा प्रचंड वाढला होता. त्यातच सायंकाळच्या सुमारास परभणी, पूर्णा, गंगाखेड, पालम या ४ तालुक्यांसह इतर ठिकाणीही जवळपास अर्धा ते पाऊणतास जोरदार पाऊस बरसला. यामुळे परभणीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

Swapnil S

नागपूर : राज्याच्या काही भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भाच्या काही भागांत अवकाळी पाऊस पडला. तसेच काही ठिकाणी गारपीटही झाली. अकोल्यासह बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. यामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. विशेषत: आंबा, लिंबू यासह भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील मळसुर भागात गारपिटीसह जोरदार वादळी पाऊस झाला. गारपीट आणि पावसामुळे आंबा, लिंबू आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले. सलग अर्धा तास वादळी वाऱ्यासह गारपीट आणि मोठा पाऊस झाला. तर दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्याच्या अनेक भागांत जोरदार अवकाळी पावसासह गारपीट झाली. खामगाव तालुक्यातील रोहणा, गानेशापूर परिसरात गारपीट व वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला.

परभणी शहरासह जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच सर्वत्र उकाडा प्रचंड वाढला होता. त्यातच सायंकाळच्या सुमारास परभणी, पूर्णा, गंगाखेड, पालम या ४ तालुक्यांसह इतर ठिकाणीही जवळपास अर्धा ते पाऊणतास जोरदार पाऊस बरसला. यामुळे परभणीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.

लातूर शहर आणि परिसरामध्ये वातावरण ढगाळ झाले. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. मागील दोन दिवसांपासून लातूर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली होती. प्रचंड उकाडा जाणवत होता. पावसाच्या हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. मागील काही दिवसांपासून उकाड्याने हैराण असलेल्या लातूरकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्याच्या विविध भागांत पुढील चार ते पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता आहे. विशेषत: मराठवाड्यातील काही जिल्हे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार विदर्भातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

दरम्यान, एका बाजूला राज्यात उन्हाचा चटका वाढला असून, बऱ्याच ठिकाणी तापमानाचा पारा हा ४० अंशावर गेला होता, तर काही ठिकाणी तापमान ४२ अंशावर गेले होते. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची काहिली सुरू झाली होती. वाढत्या तापमानाचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्यामुळे उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे.

लक्ष्मीपूजनाला वरुणराजाचे 'फटाके'! दिवाळीच्या धामधुमीत मुंबई, ठाणे, नवी मुंबईत अवकाळी पावसाचे धुमशान

दिवाळीनिमित्त मोदींचे देशवासीयांना पत्र; स्वदेशी, भाषा, आरोग्य यासह ऑपरेशन सिंदूरचाही केला उल्लेख

MMR २०४७ पर्यंत बनणार अग्रगण्य शहरी अर्थव्यवस्था; MMRDA चा विश्वास

वाढत्या प्रदूषणाने लावली वाट दिल्लीपाठोपाठ मुंबईची घुसमट; दिल्लीत AQI ३५९, मुंबईतील AQI २०० वर, फटाके फोडण्याच्या मर्यादांचे सर्रास उल्लंघन

सीआरझेड नियम : पंतप्रधान कार्यालयाकडून हस्तक्षेप