संग्रहित फोटो
महाराष्ट्र

लाँग वीकेंडला फिरायला जाताय? मध्य रेल्वेकडून स्पेशल ट्रेन्सची घोषणा, प्रवाशांच्या अतिरिक्त गर्दीवर उपाययोजना

Swapnil S

मुंबई : मध्य रेल्वेने लाँग वीकेंडचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी १८ विशेष ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कोल्हापूर, पुणे ते नागपूर आणि कलबुर्गी ते बंगळुरू या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस- नागपूर वातानुकूलित अतिजलद विशेषच्या २ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ०२१३९ वातानुकूलित अतिजलद विशेष १५ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. ०२१४० वातानुकूलित अतिजलद विशेष १६ ऑगस्ट रोजी नागपूर येथून १३.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल. ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा हे थांबे असतील.

लोकमान्य टिळक टर्मिनस- मडगाव विशेषच्या ४ फेऱ्या चालविण्यात येतील. ०११६७ विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १५ ऑगस्ट आणि १७ ऑगस्ट रोजी २१.०० वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १०.०० वाजता पोहोचेल. ०११६८ विशेष मडगाव येथून १६ ऑगस्ट आणि १८ ऑगस्ट रोजी १२.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ००.४० वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर (०११६८ साठी), खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड (०११६८ साठी), संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे (०११६८ साठी), राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव (०११६८ साठी), आणि कणकवली असे थांबे असतील.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला