एएनआय
महाराष्ट्र

गोंदियात एसटी बस उलटून ११ ठार, २५ जखमी

गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी भरधाव वेगाने जाणारी एसटी महामंडळाची एक बस उलटून झालेल्या अपघातामध्ये ११ जण ठार झाले, तर अन्य २५ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करताना बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती घसरून उलटी झाली. सडकअर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ हा अपघात झाला.

Swapnil S

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात शुक्रवारी भरधाव वेगाने जाणारी एसटी महामंडळाची एक बस उलटून झालेल्या अपघातामध्ये ११ जण ठार झाले, तर अन्य २५ जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनाला ओव्हरटेक करताना बसचालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ती घसरून उलटी झाली. सडकअर्जुनी तालुक्यातील डव्वा गावाजवळ हा अपघात झाला.

सदर ‘शिवशाही’ बसमध्ये ३६ प्रवासी होते, बस भंडारा येथून गोंदियाला जात होती. वाटेत एका दुचाकीस्वाराला चुकविताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि ही दुर्घटना घडली, असे ही घटना प्रत्यक्ष पाहणाऱ्यांनी सांगितले. अपघातामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, गोंदिया-सडक अर्जुनी मार्गावर डव्वा गावाजवळच्या मुर्दाली जंगल परिसरातून एसटीची शिवशाही बस जात होती. बसची गती मर्यादेहून खूप जास्त होती. अचानक बसने पलटी घेतली. त्यानंतर बस बरेच फूट फरफटत गेली. या घटनेत बसमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. ही माहिती कळताच परिसरातील गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.

मृतांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे गोंदियाच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून शिंदे यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता