एसटी कर्मचाऱ्यांचा १२ ऑक्टोबरला मशाल मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन 
महाराष्ट्र

एसटी कर्मचाऱ्यांचा १२ ऑक्टोबरला मशाल मोर्चा; प्रलंबित मागण्यांसाठी १३ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन

एसटी कर्मचाऱ्यांवरील ४ हजार कोटी रुपयांची थकीत देणी, ज्यात महागाई भत्ता, वेतनवाढ फरक व इतर देणी समाविष्ट आहेत. त्यासाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने १२ ऑक्टोबर रात्री १२ वाजता मुंबई सेंट्रलमधील मध्यवर्ती कार्यालयावर 'मशाल मोर्चा' आणि १३ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचा थकीत महागाई भत्ता, वेतनवाढ फरकाची रक्कम व इतर थकीत देणी अशी मिळून कर्मचाऱ्यांची ४ हजार कोटी रुपयांची थकीत देणी थकीत आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी एसटी प्रशासनाला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसच्या वतीने १२ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजता एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मध्यवर्ती कार्यालयावर 'मशाल मोर्चा' काढण्यात येणार आहे. तर १३ ऑक्टोबरपासून बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात येणार आहे.

एसटीच्या स्थापनेपासून कर्मचाऱ्यांची आंदोलने पाहिली तर अशा प्रकारचे रात्री बारा वाजता आगळेवेगळे आंदोलन या पूर्वीच्या काळात कधीही झालेले नाही. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाची झलक म्हणजेच सादरीकरण साधारण ३०० पदाधिकारी हातात मशाल व मागण्यांचे फलक हातात घेऊन दादर येथील टिळक भवन येथे संघटनेचे अध्यक्ष आमदार भाई जगताप यांच्या उपस्थितीत ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ठीक १२ ते २ वाजेपर्यंत करणार आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाचा 'टीझर' सादरीकरण करताना संघटनेचे कार्यकर्ते मागण्यांचे फलक व मशाल हातात घेऊन गणवेश घालून सादरीकरण करतील. एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा वेगळ्या प्रकारचे आंदोलन होणार असून टीझरच्या माध्यमातून सरकार व एसटी या दोघांनाही आंदोलनाचा इशारा देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे.

'शक्ती'चा तडाखा बसणार; ७ ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीला धडकणार चक्रीवादळ; मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्गला सतर्कतेचा इशारा

दार्जिलिंगमध्ये भीषण भूस्खलन; १४ जणांचा मृत्यू, दुडिया पूल कोसळला

चेंबूरमध्ये पोलिसांची धडक कारवाई; जुगार अड्ड्यावर छापा, ३३ जण ताब्यात

अंगणवाडी केंद्रे वाढणार; बालविवाह, हुंडा प्रथा रोखण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करणार

ओबीसी नेते आक्रमक! २ सप्टेंबरचा GR रद्द करण्याची मागणी, १० ऑक्टोबरच्या मोर्चावरही ठाम